वर्ण वर्ण मी गुंफीत गेलो
अन् शब्दांचा जन्म झाला
शब्द शब्द मी पेरीत गेलो
अन् काव्य आले उदयाला
चारित्र्य अन् चेहऱ्यालही
ओळख दिधली शब्दांनी
साहूकार मी तरीही केले
कर्जदार मज शब्दांनी
.... सागर दहिगांवकर
२१/०३/२०२२-
तुमच्या मनात एखाद्या व्यक्ती बद्दल
जी भावना, आपुलकी, प्रेम, आदर असतो,
त्याच व्यक्तीच्या मनात तुमच्या बद्दल
तीच भावना, आपुलकी, प्रेम, आदर
असतोच असं नाही
सागर दहिगांवकर— % &-
फितरत
कितने खुदगर्ज होते है कुछ लोग,
मदत लेने आपसे हात जोड लेते है,
और जब आपको जरूरत होती है,
तब आपसे ही मुह मोड लेते है ...
....... सागर दहिगांवकर — % &-
गरीबी जरी त्या संसारात होती
रमाची भीमाला तरी साथ होती ... धृ
पुरेसे नव्हते वस्त्र,
पुरेसे नव्हते अन्न
तरीही कधी ना झाली,
मनाने दुःखी खिन्न
अर्धांगिनी तरी भीमाची
नाही कधी रुसली
करी कष्ट काम गाळूनीया घाम
हसऱ्या मुखाने सदा रहात होती ... १
भीम शिक्षण घेण्या
दूर देशी जाता
गोवऱ्या थापायाची
घरी रमाई माता
संघर्षाने संसार केला
चंदनापरी झिजली
करी कष्ट काम गाळूनीया घाम
हसऱ्या मुखाने सदा रहात होती ... २-
वसुंधरा
रेशमी हिरवा शालू विनला
पिवळ्या फुलांची नक्षी कोरली
नव्या रुपाने धरणी बहरली
जणू भासते नार नवेली
इवली इवली कळी मोहरली
स्वर्णफुले ही जणू विखुरली
श्रावण सरला रंग निखरला
श्रृंगाराने धरणी सजली
जणू भासते नार नवेली
.... गीतकार सागर गायकवाड
६ आॅक्टोबर २०२१-
समजून घेणं आणि
समजनं यात खुप फरक आहे
समजून घ्यायला
व्यक्ती आवडती असावी लागते
समजायला
ऋणानुबंध असावे लागतात
.... गीतकार सागर गायकवाड-
अण्णाभाऊ साठे
समाज सेवेचा वसा घेऊनी
छक्कड लावणी पोवाड्यातुनी
ज्यांनी विचार दिधले मोठे
धन्य ते अण्णाभाऊ साठे .... धृ
वय होतं त्यांचं फक्त दहा
उस्फुर्त लिहीली लावणी पहा
कागल गावच्या जत्रेत जेव्हा
फक्कड गायिली लावणी तेव्हा
रसिकांची गेली तोंडांत बोटे .... १
बाबासाहेबांचे विचार घेऊनी
कामगार चळवळीस दिशा देऊनी
रशिया मधली सभा गाजवली
शिवरायांचा पोवाडा गाऊनी
दिड दिवसाचे शिक्षण असुनी
फकिरा सारखा ग्रंथ लिहिला
साहित्य रत्न पुन्हा या भूवरी
ना जन्मा आला कोठे ..... २
.....गीतकार सागर गायकवाड-
नाही गरीब है हम अमीर भी नहीं
दौलत का क्या है आज है कल नहीं
ढुंडो तो हर पल में खुशी मिलती है
धनदौलत की कोई जरूरत ही नहीं
........ सागर दहिगांवकर-
जिंदगी भरवसे के लायक नहीं
जवानी भी आज है कल नहीं
हर पल जिंदगी को ऐसे जीयो
परेशानियोंसे जैसे ताल्लूक ही नहीं
........ सागर दहिगांवकर-
बिस्तर में गले लगा के सोने वाले
बोहोत मिल जायेंगे,
पर मजा तो तब है
जब तुम दुखी हो और
कोई तुम्हे गले लगा के
तुम्हारे लिए रोये ...
....... सागर दहिगांवकर-