Sagar Dangle   (© सागर_एक अथांग मन)
64 Followers · 3 Following

read more
Joined 5 January 2019


read more
Joined 5 January 2019
10 JUL 2024 AT 12:34

पावसामधली भेट आठवून..
डोळे तसे आहेत पाणावलेले..

फुंकर घालता शब्दांच्या उबेची..
मनातले ढग तुझ्या आठवांनी व्यापलेले..

-


30 JUN 2024 AT 22:00

स्पर्शास तुझ्या ती लाट..
परतते त्या किनाऱ्यावर..

भर उन्हात या वाळूवर..
बरसेल का तुझ्या प्रेमाची सर..

-


3 FEB 2024 AT 16:53

ती भेटायला मला माझी..
नसते गरज जवळ असण्याची..

परी भेटतो जेव्हा कधी..
वाढते चिंता दूर भासण्याची..

-


3 FEB 2024 AT 16:49

लेखणीला माझ्या कळावा
गुंता तुझ्या नकार पत्रांचा..

वेधशाळा मला कळावी..
शाप तुला का नक्षत्रांचा..

-


3 FEB 2024 AT 16:47

गुंता वाढला तुझ्यामुळे..
तो सुटावा अशी शाळा नाही..

नक्षत्र तुझ्या आठवणींचे..
ती पुसावी असा फळा नाही..

-


3 FEB 2024 AT 16:39

ढगाळल्या पावसात सखे,
आठवणींची चिता पेटतेच आहे..

ठिणग्या ही मग विझतील कश्या
जखमेवर माझ्या वारा तुझाच वाहे..

-


3 DEC 2023 AT 21:41

स्वप्न ही आजकल..
तुझीच ओढ लावून जातात..

कोरलेले शब्द जसे..
कोरड्या उन्हात विरघळतात..

-


17 NOV 2023 AT 22:03

अशीच ती संध्याकाळ आठवांची..
वाट पाहण्याची..
आसुसलेल्या चंद्र प्रकाशाची..
.
अशीच ती संध्याकाळ परतीच्या पाखरांची..
क्षितीजाच्या विलनाची..
मावळत्या सूर्याची..

-


7 NOV 2023 AT 14:38

हरवले क्षण जेव्हा
आठवणी ही पुसल्या..

भास होता तुझा सखे
कविता तुझ्याच वाचल्या..

-


14 OCT 2023 AT 22:06

बऱ्याच दिसांनी त्या
झोपडीत उजेड दिसतोय..
त्या शेतकऱ्याचं नशीब
फळल की काय..

दिवाळी नाही, दसरा नाही..
याने घरातच
प्रेत जाळलं की काय..

#unknown

-


Fetching Sagar Dangle Quotes