शब्दातून व्यक्त न करावं इतकं
अबोल प्रेम मौनातच राहावं..
यातून सुटका होणार नाही एवढं,
प्रेम मृगजळात पुरेपुर फसावं..
जेव्हा कधी तुझी आठवण येता
तुझं प्रतिबिंब अंतरंगी दिसावं...
क्षणांत तुझ्यातच हरवून जाता,
गालातल्या गालात मनमुराद हसावं.
सचिन ....✨💖-
वाचाल तर वाचाल...!
वाचन कर... read more
रंगीन ख्वाबों मै नदी किनारे,
हम वहाॅ सुकून से ठहर जायें...
मिल जाये कोई शक्स ऐसा,
जिसे मिलकर आँख भर आयें...
सचिन......🙂-
उगाचच मन जाळी,
भाबड्या कल्पनेत...
नसे अंमलात काही,
नुसतं संकल्पनेत..
थांबवायला हवं आता,
शब्दातल्या लेखणीला...
आता आवर घालायला हवं,
मनातल्या अव्यक्त भावनेला....
सचिन....
-
आयुष्याच्या तिव्र संघर्षात,
जगणं असह्य होऊन जातं..
जिद्द आणि काबाडकष्टाने,
थोडसं अगदी सुसह्य होतं..
सचिन-
वार्याची झुळूक कानी येता,
नकळत तुझा भास होतो..
तुझ्या आठवणीत रमता,
क्षण हा खास होतो...
सचिन
-
तुला पाहून सखे मन माझं चुर्र झालं..
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बघ कसं भुर्र झालं..
तुझ्या श्रुंगाराचा साज तुझे सौंदर्य खुलवितो..
वेड्या या माझ्या मनाला बघ कसा भुलवितो..
✍️ सचिन ....💖-
तुला पाहिलं अन मन लाजुन चुर्र झालं..
अन स्वप्नाच्या हिंदोळ्यावर मन भुर्र झालं..
सखे तुझ्या श्रृंगाराचा साज सौंदर्य खुलवतो..
जणू पाहुन ऐसा या माझ्या मनाला भुलवतो..
सचिन विश्वास...
-
तुझ्या आठवणींचा हा पसारा..
नाही त्याला भावनेचा किनारा..
सांग ना कसं विसरू हा मनातला गुंता सारा..
सचिन
-
वाट बघतोय तुझ्या येण्याची,
तु माझं आयुष्य होण्याची,
एका अनोळख्या वाटेवर,
अवचितपणे तुझी न माझी भेट व्हावी.
ओठांतून शब्द न फुटता,
तुला माझ्या ह्दयाची प्रित कळावी,
खरं प्रेम व्यक्त होण्यास,
मौनातून भावनेची समेट घडवून यावी..
सचिन...-
धडपडता धडपडता,
पुन्हा नव्याने घडावे...
आयुष्य आहे सुखदुःखासह,
अंगणवळणी पडावे...
आयुष्यातील संकटाशी,
कायमस्वरूपी नडावे...
आपल्या संघर्षांसाठी,
स्वतःशीच लढावे...
सचिन.....
-