sachin Tribhuwan   (सchin3bhu1)
387 Followers · 421 Following

PART TIME POET FROM PUNE (MAHARASHTRA)
JUST TRYING TO EXPRESS..........
Joined 17 August 2020


PART TIME POET FROM PUNE (MAHARASHTRA)
JUST TRYING TO EXPRESS..........
Joined 17 August 2020
28 APR AT 13:25

ज्या नातेसंबंधातील मैत्रीची भावना संपुष्टात येते तेव्हा ऊरतं ते फक्त औपचारिकतेचं नातं.

-


27 APR AT 20:28

कोणी आपला का? कसा?आणी किती?फायदा घेऊ शकतो हे ज्याला कळतं तो स्वतःसाठी अधिक फायदेशीर ठरतो.

-


25 APR AT 20:03

मानवाच आयुष्यमान जसजसं जलद होत चाललेल आहे तसं तसं त्याचं जीवनमान हे मंदावत चाललेल आहे.

-


21 APR AT 9:05

जगण्यासाठी पैसे कमाविणाऱ्यांमध्ये, पैसे कमाविण्यासाठी जगणाऱ्यांपेक्षा अधिक इमानदारी व माणुसकी आढळते.

-


19 APR AT 11:16

उमेदवाराची जात धर्म व पक्ष बघून मतदान केल्यापेक्षा त्यांची वागणूक चरित्र व शिक्षण हे पाहून मतदान करणे सुजाण मतदारांचे आद्य कर्तव्य आहे.

-


17 APR AT 11:06

आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना आपण कशाप्रकारे सामोरे जातो त्यावरून आपल्या मागील संस्काराचे दर्शन घडते.

-


15 APR AT 11:34

किसी के रहम-ओ-करम पर मिली खुशहाल जिंदगी से,
खुद के दम पर जीने वाली खस्ता-हाल जिंदगी मंजूर है |
बे-कद्र से मिली हुई मेहरबानी तो,
उम्र भर के लिये विवशता की जंजीर है |

-


13 APR AT 23:00

भीमराव त्यांना कधी कळलेच नाही,
विचारांशी त्यांच्या जे जुळलेच नाही,
विशिष्ट जातीसाठी कधी लढलेच नाही,
दीड दमडी पायी कधी ढळलेच नाही.

समतेच्या हट्टापासून हटलेच नाही,
मानवाला जाती-धर्मात बाटलेच नाही,
आपापसात भेद कधी पटलेच नाही,
संविधानाने दिले हक्क जन्माने जे भेटलेच नाही.

अनिष्ट रूढींपुढे कधी झुकलेच नाही,
जाळायाला ग्रंथ हबकलेच नाही,
33 कोटी देवांनाही ऐकलेच नाही,
मानवतेच्या धर्माला कधी मुकलेच नाही.

-


10 APR AT 8:48

जगण्याचे नवल असे आहे की,आज मध्ये जगणाऱ्यांना उद्या जिवंत असण्याची श्वास्वती नाही व उद्यासाठी जगणाऱ्यांना आज जिवंत असल्याची ग्वाही देता येत नाही.

-


6 APR AT 18:14

आपण समोरच्याशी तसेच वागतो जशी आपल्याला त्याच्याकडून वागणूक अपेक्षित असते.

-


Fetching sachin Tribhuwan Quotes