वाट बघून तुझी, आसवे ही सुकली,
थकलेल्या या डोळ्यात आता
ताकत नाही राहिली
लाख बघितली स्वप्न तुझ्याबरोबर जगण्याची
पण आता निव्वळ ती व्यर्थ ठरली
विचार होता ,सोबत असताना तू..
सारे आसमंत ओलांडेन,
पण कधी वाटल न्हवत, की आता,
एका पाऊली एक वाट धरावी लागेल...
असो नसो आता कोणी सोबती
मीच माझा या मोकळ्या वाटेवरी
माझ्या आयुष्याचा सारथी.-
मनातल्या काही गोष्टी
अलगद अश्या साठव्यावा लागतात
आपल्या आठवणी खूप वेळा
जपून ठेवाव्या लागतात.
डोळ्यां समोरून सगळ
निघून गेलेलं असतं
तरी याच आठवणींची मंद झुळूक
आपल्यात नेहमी वाहत असतात
मग त्या आठवणी कशा पण असो...
चांगल्या की वाईट यात फरक मात्र उरलेला नसतो,
तो क्षण कसा निघून गेला
आपण फक्त त्या विचारात अडकलो असतो..
हव्या असलेल्या गोष्टी साधण्यात
पूर्ण आयुष्य खर्ची लावतो,
पण त्या गोष्टी मिळवत असताना
अनुभवांच्या आठवणींच गाठोड बांधत असतो.— % &-
साथ तुझी नि माझी
अशीच जन्मभर राहू दे,
प्रेम आपले हे असेच
फुलत राहू दे...🌸
वाट काढत कठीण प्रसंगातून
हे आपले नाते असेच वाहत राहू दे...
आधार आपला एकमेकांना असाच मिळू दे..
आयुष्य हे सरले तरी प्रत्येक जन्मी,
ही साथ अशीच राहू दे..— % &-
नभात हिंडून यावे जसे, मुक्त व्हावे वाटते,
उडण्यासाठी मज पंख हवे वाटते...
सगळ्या आठवणी निरखून पाहता आता
मीच मला ओळखू लागले..
खूप काही संपून गेले, पण तरीही
थोडेसे अजून काही शिल्लक राहिले वाटते...
आता उडण्या साठी साथ नको कोणाची
मीच माझ्या जीवनाची आहे सारथी..
हात देण्या आता मदतीचा, नाही डगमगत मी
कारण,
पुन्हा एकदा उभे राहण्याचे बळ आले
असे मला वाटते...— % &-
रातराणी ही पुन्हा बहरली
सुगंध तिचा दरवळला खास..
सांग मजला कुठे शोधू तुला
नजरेस माझ्या तुला पाहण्याची आस..
-
कष्ट कोणाला चुकले,
नशिबात ते सगळ्यांच्या आले.
जखमा कोणाला ना शिवल्या,
त्या तर दिवसेंदिवस वाढल्या.
खळगी भराया पोटाची
माणूस हा माणूस न राहिला.
तारेवरची कसरत केल्या,
सुखाचा एक घास भेटतो.
परत दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहाने
त्याच वाटी परत जातो.
काळ सरल्या वर त्याला आठवण होते
काय सोडले आपण पाठी आपल्या
परत त्या जुन्या आठवणीं येता,फक्त दिसतं,
हातावरच्या जखमा अन् अंगावरच्या ठीगळ्या ..-
लम्हे तो ऐसे ही गुजर जायेंगे
कुछ चले गए है, कुछ आने बाकी है ।
फिर से पाना चाहेंगे हम किसी लम्हे को
पर अब वो लम्हे और दौर, कभी ना आयेंगे ।
-
गुमसुम हूं,नाराज हूं,
किसी बात से अंजान हूं.।
अकेलेपन से डरता हूं,
इसीलिए अपने ख्वाबों के साथ हूं..
खबर नहीं अब किसकी, बेखबर जैसा हूं।
पता नही क्या हो रहा है ये,
जैसे में अपने आप में शामिल नहीं हूं..-
निराश असलो, रुसलो जरी मी
साथ तुझी कायम असते
आनंदी असलो, हसत असलो
आठवण तुझीच येते
मनात माझ्या तुझी रचना
कायम ही होत असते
कधी नवी तर कधी जुनी
अशा मधे तु विभागलेली असतेस
कविता माझ्या सध्या सोप्या
पण मनातल्या असतात
कोणीही वाचल्या तरी त्या
प्रत्येकाला हव्या हव्याशा वाटतात.
-
चाफा दरवळला फुलूनी त्या झाडावर,
रंग जरी शुभ्र असला ,
तरी खुलून खूप दिसतो तुझ्यावर...-