गणित भूमिती शिकता शिकता बेरीज तोंडपाठ राहीलं,
आठवणीच्या ओझ्यांचं मात्र वजाबाकी करणं राहीलं..
सगळे दिवस सारखे म्हणत,वर्ष सुद्धा सरलं,
का कुणा ठाऊक तारुण्य हळूच वाढत राहिलं..
दिसण्या जोगे सुंदर जरी आपण, मन सुंदर असेल का?
कधी केलाय का स्वतःलाच प्रश्न? मी सगळ्याच गोष्टीत बसेल का?
नवीन वर्ष सुरू होताच मी बरेच निश्चय केले,
वर्षा अखेर पुन्हा,आज उद्या वर लांबवत गेले..
शक्य होईल का कधी तरी,तेच बालपण अनुभवायला,
एक दिवस का होईना पुन्हा लहान होऊन जगायला.
आठवतात ते सर्व दिवस,नव्हती कशाचीच चिंता,
माणसाला च हल्ली माणसाचा नसतो थांगपत्ता..-
तिचं माझं नातं काहीसं लाट अन् समुद्रकिनारा असं होत..
ती नेहमी खवळलेली,चिडलेली असायची
अन् माझ्या मिठीत शिरली की अगदी शांत होऊन जायची..
-
जिवलग
एक हक्काची मैत्रीण/सखी असावी,
जिला न सांगता मनातली,सगळी व्यथा कळावी..
तासनतास बोलताना मन तिच्याजवळ व्यक्त व्हावं,
तिला माझ्या प्रश्नाचं उत्तर सहसा आधीच कळलेलं असावं.
तिच्या समवेत बोलताना, कसलंही संकोच मनात नसावं.
ढसाढसा रडताना मात्र,तिने हळूच अश्रू पुसावं.
न सुटलेलं कोडं ही,ती सोबत असली की सुटतंय.
उदास झालेला चेहरा पाहून, तिला जरा हायसं वाटतंय.
आठवणींच्या प्रत्येक कोपऱ्यात,
मला तूच कशी भासतेस गं.
परक्या या दुनियेत माञ,
जिवलग म्हणू वाटतेस गं..
-
आयुष्याच्या वहीच तू कायम
दुसरं पान असशील
कारण आपण पाहिलं पान
नेहमी रिकामंच सोडून देतो..-
शाळेत जाताना घरी,चहा पिऊन जाणारे आम्ही,
कॉलेज मध्ये मात्र,कॅन्टीन शी मैत्री झाली..
मित्रांच्या त्या घोळक्यात मात्र,
सगळी आवड निवड ओळखून आली..
तो कटिंग अन् मित्र,खूप जवळीक होती आमची..
सध्या च्या दुनियेत,तीच नाती अनोळखी वाटायची..
कट्टा अन् ते मित्र,नेहमी रंगीन मैफिल जमायची..
एकमेकांना चिडवन्यात तेव्हा,वेळेची कमी भासायची..
चहा मात्र म्हंटला की,आमचा सदैव होकार असायचा..
Mood fresh होण्यासाठी,हा आमचा जालीम उपाय राहायचा..
नातं ही वेगळंच होत,त्या कटिंग सोबत जुळलेलं..
चार चौघात मिळून मिसळून,मैत्रीत फुललेलं..
-
माझ्या साऱ्या स्वप्नांवर पांघरून घातलंत तुम्ही..
कारण दिवा पणती भेद करत,सारं बंधनं टाकलंत तुम्ही..
दहावी झाली अन् न शिकण्याची अट तुम्ही घातली..
धुनी भांडी करण्यातच माझी शिक्षणाची ओढ सुटली..
मलाच का? हा प्रश्न मी सतत गुणगुणत राहिले..
घराघरात मला मात्र बंदिस्तच करून सोडले..
आई बाबा का फक्त,मुलींना च बंधनं असतात..
मुलांना मात्र त्यांच्या विश्वात अतोनात सुट भेटतात..
का म्हणून मलाच एवढी,बंधनं लागू पडतात..
हवं तसं जगावं,पण स्वप्न पुन्हा बंधनात अडकतात..-
चलते चलते रूक गए वो,
कुछ मंजिले पूरी करनी बाकी थी।
आज भी ना जीत पाए वो,
क्योंकि कई अपनोंकी झोली खाली थी।
-
ते ऐकवत राहिले,आम्ही ऐकत राहिलो,
दुर्लक्ष करीत मात्र सर्व सोसवत राहिलो..
वेळ येते हो सर्वांची,फक्त येण्याची वाट पाहतोय,
सर्वांना दाखवून देऊ की आम्ही स्वाभिमानाने जगतोय..
तुम्ही किती काही करा,आम्ही दुर्लक्ष तेवढं करू,
हसणं,रूसण जपत आवडीने जगायला हात धरू..
नाही कधीच कमी पडत,सगळं व्यवस्थित सुरू आहे,
जाणून तरी काय कराल तुम्ही,आम्ही आमच्यातच गुंग आहे..-
तू आहेस म्हणुन,चाललंय तसं सगळं सुरळीत..
पण काय माहित,
वार,तारीख अन महिना,समदं चुटकीसरशी निसटलं,
तुझ्या कडे पाहण्याचं,नित्यक्रम मात्र पालटलं..
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये,तुला उलगडनं राहून गेलं,
वर्ष आता सरलं तरी,तुझं पान सगळं दुमडून गेलं..
प्रत्येक गृहिणीच्या घरातली,रद्दी तु आता झाला,
आम्हा सामान्यांसाठी मात्र,तुझा उपयोग पुरेपूर झाला..-