राजकीय गणितं
प्रश्नपत्रिकेची गणितं वेगळी,
लिहिलेल्या उत्तरांची गणितं वेगळी,
तापासनरा वेगळ्याच गणितात,
अशाने गणितेच हारून जातात.
की त्याच काय झालं,
प्रमेय होतं ३०,६०,९० चे,
काही लिहून आले दुभाजकचे, काहि भेदा भेदीचे,
काहींनी जवळ जाण्याचा प्रयत्न ही केला
पण ते ही लिहून आले ६०, ९०, ३०चे.
अन जेव्हा निकाल लागला
तेव्हा वेगळेच गणित पाहायला मिळाले,
जे पहिले होते ते लिहून आले होते त्यांचा मीटिंग चे.-
शब्दांचा मायावी दुनियेत हरवते.
त्या दुनियेतले आयुष्य जगावे,
सर... read more
क्षण
क्षणा क्षणाला तुझा भास होतो,
क्षणास त्याचा ऱ्हास होतो.
क्षणातच मनास भुरळ पडते,
क्षणा क्षणाला तूच आठवते.
प्रत्येक क्षणाला हेच वाटते,
मनातले माझ्या तुझं सांगावे.
पण खरं तर तसे नसून ,
ते तुझं ना सांगताच कळावे.
-ऋषिकेश अंकुशराव ।।एक कवी।।-
कोणत्या दिशेला जातोय आता थोडं confusing झालंय,
मधे मधे असलेली छोटी धैय पूर्ण तर होत आहेत,
पण आता destination नेमकं कोणते हे समजत नाही आहे.
ट्रेन बदलावी का? प्रश्न सारखा येऊ लागला आहे,
लांबचा पल्ला आहे तर fast ट्रेन ने जाऊ का,
की ट्रेन slow आहे पण बसून प्रवास होतोय,
याचा आनंद घेऊ.
तोच घेतलेला बरा वाटतो कधी कधी,
पण destination काय, हेच समजत नाही आहे...-
लसीकरण हे आता ऑनलाईन घेतल्या जाणाऱ्या शिक्षणाप्रमाणे झाले आहे, बहुतेक जण फक्त सर्टिफिकेट मिळवण्याकरिता घेत आहेत...
-
शुभेच्छा
शुभेच्छा आज खूप आल्या,
पण शुभेच्छा, आज नाही आली.
विचार करून, वाट पाहून दिवस निघून गेला,
पण शुभेच्छा अजून काही आलीच नाही.
असो नसावा मी कुणी कुणासाठी,
म्हणून शुभेच्छा नसाव्यात माझ्यासाठी,
हे दुःख समजावे की अजून दुसरे काही,
की शुभेच्छा न देणारे आपलेच नाही..
या दिवसाला काय बोलावे तुम्हीच सांगा,
फार काही नको हवा फक्त एकच धागा.
धागा विश्वासाचा, प्रेमाचा, नात्याचा, आनंदाचा,
जो देईल पुढल्या वर्षी या दिवसाला अर्थ साजरा करण्याचा,
असो शुभेच्छा आल्या आज खूप काही,
मात्र शुभेच्छा काही आली नाही...-
दोस्ती वाली बस्ती
दिलो में सबके,
एक बस्ती बसी है।
जिसे ये दुनिया,
दोस्ती कहती है।
यहाँ वो धर्म-जात वाला,
रोग दिखाई नही देगा।
हर मुश्किलों में साथ देनेवाला,
हाथ ही हाथ दिखेगा।
इधर अजीब अजीब से नमूने है,
ये मेरे दोस्त सारे के सारे कमीने है।
साले सामने तो एकदूसरे को गली देंगे,
पर पीठ-पीछे तारीफे ही करेंगे।
अगर कभी मौत भी आ जाए,
दोस्तों को देख भाग जाएगी।
हमारी प्यारी वाली यारी देख,
वो भी लंबी उमर की दुवा मांगेगी।-
दोन अधिक दोन पाच झाले असेल
चुकीचे ही बरोबर झाले असेल
जर गणिताच्या पेपरच्या जागी
राजकारणाचा पेपर झाला असेल-
वाघराणी
तू ही झालीस ना आंधळी माझ्याचसारखी,
पण तुला सांगते, जसं दिसतं तसं नसतं या जगी.
मला वाटणारी भीती आज खरी ठरली,
तुझी दृष्टीच तुझ्यापासून हिरावली.
पण तुझी आई आहे, तुला अशी घडवते,
तुला अंधराणी नाही, तर वाघराणी बनवते.
दृष्टिहीन असलेली तु उद्या असं काही करशील,
तुझा दृष्टीतून तूच या जगाला नवा दृष्टीकोन देशील.
या जगात जसं दिसतं तसं नसतं हे तू खोटं ठरवशील,
अन मनाच्या दृष्टीने या जगास जग पाहायला लावशील-