नियतीची क्रूरता आज
खालच्या थराला जाऊन पोहचली
निष्पाप अबोल बालकांना आज
क्षणार्धात गिळून बसली
मायेचा पदर आणि बापाची करंगळी
आज दोन्ही हिरावून गेले,
सांग ना देवा त्यांच्या हातून
असे मग कुठले अपराध घडले
विश्वास श्रध्दा ठेऊन तुझ्यावर
ती माय आस लावून बसली ,
कुशीत बाळ घेण्याआधीच
तू कुस तिची उजाळली ,
किती निष्ठूर होशील
आणखी ते तरी कळू दे ..
दगडाच्या देवा तुलाही
आज पाझर जरा फुटू दे ...
-रुपाली सपाटे'स्वरूपा'-
कधी हसायची कधी रुसायची
कधी नुसतीच प्रतीक्षेत तळमळायची..
सख्या तुझ्या सोबतीने
माझी कविता पाना पानांवर बहरायची
प्रेमाच्या त्या सुवासाने कधी धुंद व्हायची..
कधी हळूच गाली माझ्या स्मित बनून फुलायची ..
शब्द शब्द ओठांतून जणू काव्य बनून स्फुरायचे
भाव माझे क्षणात तेव्हा जणू तुला स्पर्शून जायचे
सर्वच सुखद अनुभवताना कसली ही अवकळा आली
हसऱ्या माझ्या कवितांना जणू दृष्टच कुणाची लागली
तू गेल्याने हरवून बसले मी माझीच मला आता
तुझ्या विरहात रडते आहे ,होऊनी
प्रत्येक कविता माझी जखमी आता ..-
काय झालं अस अचानक की
वळणच बदललं आयुष्याचं
नियतीने डाव साधलं आणि
क्षणार्धात सर्व उधळून गेलं..
-
एक संवाद स्वतःशी रोज आवर्जून घडावा
सर्व प्रश्न बाजूला सारून कधीतरी मग
स्वतःचा विचार व्हावा..-
बदलते वक्त के साथ साथ
चेहरे भी बदल जाते हैं
उम्रभर साथ निभाने का वादा करके
पलभर में मुकर जाते हैं..-
दिल को तसल्ली हो जाती हैं तुमसे बात करके
की अब भी कुछ बाकी हैं हमारे दरमियाँ..-
सज्ज झाली रात्र पुन्हा एकदा,
आगमनास नव्या वर्षाच्या..
घेऊ ध्यास पुन्हा एकदा
राहिलेल्या त्या स्वप्नांचा..
जोडू बंध पुन्हा नव्याने
विस्कटलेल्या नात्यांचा..
करू प्रयत्न पुन्हा एकदा
क्षितिजाला कवेत घेण्याचा..
नवीन स्वप्न ,नवीन ध्येय
संकल्प नव्याने घेवूया..
निरोप देवूनी गतवर्षाला
स्वागत नव्याचे करूया
-रुपाली सपाटे
-
मायूस हो दिल कितना भी
लब खोलो तो सही
घुटघुटके यू रहना क्या
कुछ बोलो तो सही..
-
वक्त फिसलता गया रेत के भांती
और हम पिछे ही रह गये
मंजिल तो तय की थी
पर रास्ता भटक गये
निकल पडे हैं सब हमे तनहा छोडके
आखीर जिंदगी की इस दौड
में हम कहाँ रह गये..
-