रेणुकेचा पुत्र तू श्री परशुरामा ।
नाम स्मरताची पुरती कामना।
जय जय हे मुनिश्वर' हे परशुधारी ।
विष्णूचा अवतार तू ब्रम्हचारी।।। धृ।।
उखडोनी पर्वत केला आकांत।
क्रोधे शोभे हा जमदग्नी सूत।
मातेसी प्रिय हा जटाधारी । ।। १।।
जय जय हे मुनिश्वर हे परशु धारी।।
सहस्त्राजुने छळले माता पितयासी।
एकवीस वेळा निक्षत्रिय केले पृथ्वीसी।
धगधगती ज्वाळा' भये कापे पृथ्वी सारी ।।२।।जय जय हे मुनिश्वर हे परशु धारी।।
धावुनी ये भगवंता संकटी अवनी।
तुजविण तारणहार नसे दुजा कोणी।
प्रार्थीते तुजला माधव नंदनी।
प्रगट हो पुन्हा हे करूनकारी।।३।।- @RUPALI PARNERKAR
10 MAY 2024 AT 9:01