नजरेसमोरून जाताना
त्या नजरेतच सामावलास,
नजर एकरूप होताना
नयनपुष्पीच विसावलास...

बोलत बोलत हे चंचल मन
आपसूकच जाणून घेतलस,
माझ्या मनीचा मनकवडा होऊन
मनाच्या घरट्यात स्थिरावलास...

माझ्या दुःखात मला आनंदी केलस
माझ्या सुखात स्वतःचाही आनंद शोधलास,
ह्रदयातल्या तुझ्या निश्चल विसाव्याने
नकळतच माझा होऊन गेलास...

माझ्यात तु अन् तुझ्यात मी दिसेपर्यंत
विचारांची झाली देवाणघेवाण,
तुझ्यातच माझं प्रतिबिंब निरखलं
हरपून सारं देहभान...

- रुचा