स्त्री
काही कळत नाही काय घडतंय माझ्या सोबत..
खूपच भीत वाटत चालली आहे पुरुष या जातीबाबत..
लहान मोठयाचा फरक विसरला आहे..
वासनेपोटी माणुसकीचा गळा घोटला आहे..
अजून किती सहन करू रे तुझे असले घाव..
जीव मुठीत ठेऊन जगताना सतत विचार करत असते,
पुन्हा निघेल का माझ्याच घरात माझे नाव..
खूप थकली आहे रे..
सततच्या घाबरण्याला..
खूप प्रश्न पडलेले आहेत माझ्या स्त्री पणाला..-
12 AUG 2018 AT 16:24