अव्यक्त
हळुवार एखादी भावना मनाचा ताबा घेते की मग काहीच सुचत नाही,
कुठे कामात मन लागत नाही की ती भावना काही पिच्छा सोडत नाही.
वरकरणी ती भावना अगदी तरल वाटतं असली तरी तिच्यात दिवस दिवस अडकवून ठेवण्याची तर कधी आयुष्य उध्वस्त करण्याची ताकद असते.
ती भावना मग व्यक्त करू न शकणारी व्यक्ती मग कधी कशी वागेल याचा नेम नाही.
कधी कधी त्या भावनेच्या आहारी जाऊन आपण
काही अनमोल नाती जखमी करतो तर कधी गमावतोही.
चिक्कार उपाय असताना आपण मात्र घुटमळत राहतो सतत त्याच विचारात.
कधी समोरच्याचा अंदाज न आल्याने तर कधी अनामिक, सामाजिक भीतीपोटी
त्या भावनेशी प्रामाणिक राहून अव्यक्त राहनचं पसंत केलेलं काय वाईट,
अस म्हणून पुन्हा त्या भावनेच्या गर्तेत अजून काही
काळ घालवण्यासाठी स्वतःला तयार करतो.-
चीड
मला चीड आहे ह्या स्वतःच महत्व पटवून देणाऱ्या, सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी इतरांचा वापर करणाऱ्या प्राण्यांची...
जेव्हा ते काही देऊ शकतात तेंव्हा ते फक्त हेळसांड करतात इतरांच्या सन्मानाची, भावनांची...
पण तीच वेळ इतरांवर आली तर ते मधमाशी सारखे चिकटू लागतात अगदी समोरच्या परिस्थितीचा विचार न करता...
जेव्हा तुम्ही त्या स्थितीत आहात तेव्हा इतरांना तो आदर सन्मान नाही दिलात मग इतरांची ती तर परिस्थिती नसेल तरी आगंतुक सन्मानाच्या लालसेला हापापलेल्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवावी...
कधी कधी माणसाला राग यावा, त्याने ती चीड आत्मसन्मानासाठी असेल कधी कधी आपण नमतं न घेता भिडायला हवं न पटणाऱ्या गोष्टीसाठी...
आधीच्या पिढीने ज्या चुका नको तिथे नम्रतेने वागलं म्हणून तुम्ही तसं वागलच पाहिजे असं नाही,
चीड बदल घडवण्यासाठी, चीड नवीन वाटा धुंडाळण्यासाठी, चीड नाही म्हणता न येण्याची, चीड आपला फायदा घेणाऱ्यांची...-
बिजली सी बातों के फसाने,
इसके कामो अलग ही तराने...
खुदनशी सी कभी बच्ची,
लगती थोडी सच्ची...
इसकी मुस्कान में है साजगी,
बेपरवा हसी लाती है ताजगी...
ख्वाबो में है मशरूफ,
अपनी ही खयालो में है महफुज...
कभी लगती है गुस्से का सैलाब,
कभी जज्बातों का मेहताब...
कभी ख्वाहिशो की हवा सी,
कभी भटके रास्तो की दिशा सी...
है वीर सी, कभी बच्ची सी,
लगती थोडी सच्ची सी...-
आजी...
आई, सात वर्षे झाली पण तू सांगितलेल्या गोष्टींचा
ओलावा अजून जाणवतो आहे...
जुनाट साड्यांतून साकारलेल्या गोधडीतून
तुझी ऊब अनुभवतो आहे...
तुझे थरथरते ओठ आता माझ्या गालावर
प्रेम ओसंडत नाहीत...
कोणतंही पुस्तक आणल्यानंतर तुझ्या
आठवणी आल्याखेरीज राहत नाहीत...
गावी घर आता सुन वाटतं,
ओलावा शोधतो घरभर...
अजूनही वाटतं, तू बोटं कितीही दुखले,
तरी फोडत असशील शेंगा दिवसभर...
आता जाणवतोय आमच्याच
अहंकाराचा हिंदोळा...
खरंच आठवतोय तुझा
मायेचा झोपाळा...
चाललोय तर आहोत
घेऊन भार भविष्याचा...
निर्धार हवा आहे
तुझ्या एकीच्या संचिताचा...-
तेरी हुनर का शागिर्द बनू
आजमाईश है तुमसे,
मासुम हसी का तलबगार बनू
फरमाईश है तुमसे...
साथ गुजारे लमहें समिट ने की
ख्वाईश है तुमसे,
हम साथ हो ना हो तेरी खुशी की
गुजारिश है तुमसे...-
मगरूर तो नही मैं,
सिर्फ रिश्ते ने रुख बदल लिया है...
वक्त ने माफीयों से जादा,
गलतियों पगडा भारी किया है...-
ऐसी दिललगी की बातें किया ना करो,
हाये मोहब्बत
तेरे अल्फाज के तराने रोज़ाना हमे,
तेरे ही गीतो में गुमसुम करते हैं ।।-
वाटतं माझा लाड,
ताई पेक्षा कमी होतो...
पण तुझ्या ह्या वयातही,
माझ्यासाठी ढाल तू होतो...
हल्ली फार गोंधळतो,
अन् रागाचा सुटतोय ताबा...
तरी ठाऊक आहे,
तू पाठीशी आहेस बाबा...
यश-अपयशाच्या,
स्पर्धेत गुरफटलोय...
पण धीराने लढायचं,
हे तुझ्याचं छत्रात शिकलोय...
वयासोबत शारीरिक,
त्रास होतोय...
हे जाणून सुद्धा,
आमच्यासाठी का लढतोय...-