कर्मवीर- रयत माऊली
रयतेच्या शिक्षणासाठी, जो चंदन होऊन झिजला,
ज्याच्या कार्याचा सुगंध, दाही दिशांत दरवळला,
उजळावया जीवन लाखोंचे, जो स्वतः जळाला,
तो 'कर्मवीर' सांगा, आम्हास कितपत कळाला?
असंख्य आली संकटे, तरी नाही डळमळला,
कित्येक मिळाली प्रलोभने, तरी नाही डगमगला,
शुभ्र दाढी, पांढरी कपडे तरी, कधी डाग न लागला,
थोर सौभाग्य महाराष्ट्राचे, हा कल्पवृक्ष त्यास लाभला।
सारथी बनून लाखो अर्जुनांचा, ज्ञानाचा रथ हाकीला,
हा आधुनिक भगीरथ ज्याने, ज्ञानगंगेचा प्रवाह वाहिला,
दलित-ब्राह्मण, गरीब-श्रीमंत हा भेद ना पाहिला,
हाच तो तपस्वी ज्याने, मुलांत देव पाहिला।
पाटलांची 'आदाक्का', भाऊरावांची 'लक्ष्मी' झाली,
पतीस साथ देण्या, जणू "ज्योतींची सावित्री" च आली,
कर्मवीरां सारख्या वटवृक्षाची, ती गर्द सावली झाली,
'रयत' च्या लेकरांची ती "रयत माऊली" झाली।-
शेतकर्याच दुःख सांगा कुणाला कळतय?
पिझ्झा बर्गर खाताना बार्गेनिंग कोण करतंय,
भाजीचा दर वाढला की, सगळं जग बोंबलतय,
एक दोन रुपयांनी, म्हण बजेट कोलमडतय,
शेतकर्याच दुःख सांगा कुणाला कळतय?
श्रीमंत व्हायला नाही, तो पोटासाठी राबतोय,
स्वाभिमानाणं जगायला रक्ताचं पाणी करतोय,
भुमी पुत्रच आज आपल्यासाठी सीमेवर लढतोय,
शेतकर्याच दुःख सांगा कुणाला कळतय?
कधी दुष्काळात पिकं होरपळताना बघतोय,
हाताला आलेलं सुख पुरात वाहताना बघतोय,
परिस्तिथीशी झुंजायला पुन्हा उभा ठाकतोय,
शेतकर्याच दुःख सांगा कुणाला कळतय?
एकच असली भाकरी तरी अर्धी वाटून खातोय,
फाटकीच त्याची झोळी तरी दान आनंदानं देतोय,
गावगाडा चालवताना तो 'बळीराजा' होऊन जगतोय,
शेतकर्याच दुःख सांगा कुणाला कळतय?
बळीराजा पुन्हा वामन तुझ्याकडे आज भीक मागतोय,
कराराच्या नावाखाली तीन पावलं तुझी जमीन मागतोय,
तीन कायद्याखाली पुन्हा तुला पाताळात ढकलतोय,
डोळे उघडुन बघ तुच, तुझं दुःख कुणाला कळतंय।।-
खंजर उतारा भारतमाँ के सिने मे ऐसा,
दिल मे अभिभी जो सलता है,
बटवारा वो गुनाह हुआ जीससे,
अबतक सरहद पर खुन बहता है।
हक बता रहे है मुल्क पर वे,
जिनके पूरखोने जिन्ना को वोट दिया,
'पाक' भेट देकर उनको,
उपरसे बटवारेमे तय 'नोट' दिया।
बन गये वो बाप राष्ट्र के,
जाने वालोंको जिसने रोख लिया,
एक आदमी की महानता खातीर,
सारे देस को वडवानल मे झोक दिया।
सहिष्णू रहना, भाईचारा बढाना,
हरवक्त सिर्फ हमारा कर्तव्य थोडी है,
अब घर मे घुसकर मारते है,
ये ऊस वक्त का हिंदुस्थान थोडी है?-
विष भरली नजर कधी,
कधी घालती हात पदराला,
नर राक्षस माजले भूवरी आता,
जाळती तेजाबाने सुमुखाला!
स्त्री शक्ति वरी पसरला आई
कलियुगी असा हा अंधार काळा,
ममतेचे रूप नको आता,
घे रूप अक्राळ विक्राळा!
कर धारण कालीचे रुप आता,
घालुनी गळा नर मुंड माळा,
अंगार भरल्या डोळ्यांतून निघूदे,
धगधगत्या जणू ज्वाळा!-
वो खुशी मिलेगी उस दर पर,
युंही बेवजह किसी के खुशी की वजह बनकर,
मायुसों के चेहरे पे फिरसे हँसी छलक जाएं,
कुछ ऐसा करले, मा की कोक धन्य हो जाए।-
बस इतनिसी ख्वाहिश थी मा-बाप की,
के हमारी हर ख्वाहिश पूरी कर सके,
हमने भी उतनिही ख्वाहिशे कि,
जिसे वो बिन दिक्कत पूरा कर सके!
बात ये न थी कि वो मना कर देते,
वो तो चाहे स्वर्ग भी जमिं पर ला देते,
उनके प्यार से ही खुश थे हम इतने,
के स्वर्ग भी हम ठूकरा देते!
इतने भी रईस नहीं थे की हर चीज खरीद पाते,
लेकिन कुछ मांग ले बच्चें तो जी जान लगा जाते,
अपनी जरूरतों से ज्यादा ही दिया है हमेशा,
तो हम भी उससे ज्यादा ख्वाहिश कैसे कर पाते?-
काळया आईची लेकरं, मातीत सोनं पिकवतो,
उर फाडुन धरणीचा, पेरणी आशेची करतो!
होता पैजवार सारं, पीक वाऱ्यावर डोलते,
कुनबिणीच्या गालावरची, कळी हळुच खुलते!
रान बघुन हिरवं, मनाला उधाण फुटते,
जागेपणीच डोळ्यांत, सुखस्वप्न नवे फुलते!
पण....
सुख बघवेल कसं नियतीला, अघोर तिचा घाला,
कधी दुष्काळ देई, कधी अवकाळी पावसाळा!
निष्ठुर अशी ही नियती, वाट बिकट आखते,
स्वप्न जागल्या रातीची, लांब पहाट राहते!
चीज होण्या आधीच कष्टाचं, माती त्याची होते,
राख होते स्वप्नांची, आयुष्याची आभाळ होते!
सहन करायची कला, धरणी आईंच शिकवते,
उभं आभाळ पेलायच बळ, तीच त्याला देते!
मोठी मायाळू ही आई, घास आनंदाचा देते,
मुठभर पेरता दाने, त्याची मणभर रास होते!
दाम मागतो घामाचं, नाही फुकटची हाव,
उगा मागू नका पाडून, शेतमालाचे भाव,
उगा मागू नका पाडून, शेतमालाचे भाव!-
क्यूँ ये बवाल उठ रहा है, भारत के गलियारों में,
कौन सपुत, कौन पिता है, आजादी के बलिहारियों में।
गांधी, भगत, बोस, सावरकर, सभी अतुल्य है अपनी गरीमा में,
पथ अलग थे इनके लेकिन, कोई कम नहीं राष्ट्रभक्ति की सिमा में।
जाने कितनी लाशें है बिछी, आजादी की इस राह में,
जाने कितने हुए कुरबान यहां, आजादी की इस चाह में।
हर कोई है महात्मा यहां जिसने, देश खातिर सर्वस्व का है त्याग किया,
हर कोई है भगतसिंह यहां, जिसने हसते हसते प्राण है त्याग दिया।
हर नारी झांशी वाली रानी है, हर जवान सुभाषचंद्र बोस है,
हर कविता में सावरकर है बसे, हर मन में ' जय हिंद' जयघोष है।-
आजही आठवतोय तो क्षण, तुला पहिल्यांदा पाहिलं होतं,
सहा पौंडाचचं शरीर तरी, मोठी जबाबदारी वाटत होतं,
ओठांवरती हसू असलं तरी, डोळ्यांत पाणी आलं होतं,
आनंदा पुढे आमच्या, खरंच आकाश ठेंगणं झालं होतं!
चिमुकल्या हातात तुझ्या, बाबाचं बोट घट्ट धरत होतीस,
इवलुशा तुझ्या डोळ्यांनी, नव जग न्याहाळत होतीस,
आमच्याकडे पाहून गालातच गोड हसत होतीस,
खळखळनाऱ्या धबधब्या सारखं, मन चिंब भिजवत होतीस!
कसं सांगू, मनाची काय स्तिथी झाली होती,
पहिल्यांदाच सजीव बाहुली हातात घेतली होती,
व्यक्त व्हायला शब्दांची गरज भासली नव्हती,
डोळ्यांनीच भावनांची भाषा चालली होती!
मान्य आहे कविता कळण्याचं तुझं वय नाही,
माझ्याकडे देण्यासारखं मौल्यवान दुसरं काहीच नाही,
कवितेतून आज मी माझ्या मनाचा कप्पा उघडत आहे,
तुझ्या बालपणाचे क्षणचित्र, अलगद जपून ठेवत आहे!
आज न उद्या तुला कविता नक्कीच समजतील,
काकांचे हे शब्द तुला परत बालपणात घेऊन जातील!-
दोन तलवारी दोन हातात, रोखले वादळ श्वासात,
पळस फुलावा वसंतात, अंगार फुलला तसा डोळ्यात!
जणू लखलखे वीज हातात, तशी तळपे तलवारीची पात,
नागीण सळसळती जणू हातात, तसा दांड पट्टयाचा अाघात!
बाजी घुसे गणीमात, जसा सिंह मृग कळपात,
सपासप उडवी गर्दने गणीमाची, संचारे विरभद्र अंगात!
वारास करी प्रतीवार, घातास करी प्रतिघात,
बाजी लढवी खिंड आवेशात, पसरली भीती गनिमात!
इंच इंच जखमा अंगात, बाजी न्हाला पुरा रक्तात,
तरीही ढील नाही प्रहारात, घुसे गोळी मग छाताडात!
आली अंधारी डोळ्यात, बाजी पडला रक्ताच्या थारोळ्यात,
राजांना दिलेलं वचन ध्यानात, घेई पुन्हा शस्त्र हातात!
इतक्यात.....
तोफेचा आवाज घुमे कानात, राजे पोहचले सुखरूप विशाळगडात,
थोर बलिदान स्वराज्यात, ३०० बांदल राहोत नित्य स्मरणात!!!!!-