रोहित बाळकृष्ण दुधवडकर  
20 Followers · 1 Following

Joined 30 June 2018


Joined 30 June 2018

“SUCCESS”
is
Depends on
2nd Letter
&
That is
"U"

-



प्रस्तावना
मनाच्या कोपऱ्यात हळुवार अशा सुमधुर क्षणांची
भुरळ घालणाऱ्या स्वप्नातील परीला समोर पाहताना
एक छबी तयार झाली. खरच ती तशीच असती ?
हे मांडण्याचा प्रयत्न करताना नकळत हृदयात
स्पंदन तयार झाली. तिच्या स्मित हास्याने
काळजाचा ठोका चुकवला. अन् लेखणीने
शब्द सुमनानी तिचे अस्तित्व कागदावर उमटले.
तिचा स्वाभिमान, कर्तुत्व, अट्टाहास, प्रेम, आपलुकी,
जाणीव, विश्वास, तडजोड, निर्मळता, अदाकारी यांना
स्मित स्पंदनाच्या रुपात आज सादर करत आहे.

-



Resolution 2024

Health is wealth - आरोग्य ही संपत्ती
Leadership 300 - लिडरशिप ३००
Camp In-service - कॅम्प इन सर्विस
Expansion of Team - संघ वाढवणे
Leadership Factory - नेतृत्व क्षमतेची फॅक्टरी
Branch Planning - ब्रांच प्लॅनिंग

-



Resolution 2022
Time management - वेळेचे व्यवस्थापन
Team management - संघ व्यवस्थापन
Leadership Goal - नेतृत्व ध्येय
Do or Die - करु किंवा मरु
Health is wealth - आरोग्य ही संपत्ती

-



किती छान झाले असते
जर घड्याळाचे काटे
मागे घेता आले असते
प्रत्येक क्षण
पुन्हा नव्याने जगता आले असतें…

-



जिभेला हि हृदय असतं तर,
अनेक मन जिंकता आली असती
शब्दांची होणारी वाताहत,
क्षणात मिटवता आली असती
- RD

-



"माझ्यातला मी"

यशाच्या शिखरातील
अहंकार आहे मी
मनाच्या गर्दीतील
एकांत आहे मी

त्या वाईट स्वप्नांचा
साक्षीदार आहे मी
घडलेल्या कृत्यांचा
पश्चाताप आहे मी

काळाच्या पडद्याचा
सूत्रधार आहे मी
शेवटच्या क्षणांचा
माफीदार आहे मी

RD

-



Resolution 2021
Goal Set - ध्येय निवड
Time Management - वेळेचे नियोजन
Positive Efforts - सकारात्मक प्रयत्न
Health is Wealth - आरोग्य हिच संपत्ती

RD

-



आजची कौतुकाची थाप
उद्याचा कदाचित शाप असेल
अस्तित्व टिकवण्याच्या लढाईत
कोणीतरी कोणाचा बाप असेल

प्रत्येक माणसाच्या प्रवृत्तीला
हिच कृतीतून चपराक असेल
हरवूया विरोधकांना एकमताने
हिच आपल्या भविष्याची वाट असेल

- आर डि

-



हृदयस्पर्शी डोळ्यांमध्ये
पुन्हा तोच भाव दिसावा
अबोल त्या शब्दांना
कोमल अंकुर फुटावा

नकळत झालेल्या चुकांना
मायेची पांघरून पडावी
विश्वासाची नाती पुन्हा
नव्याने जिवन जगावी

आयुष्यातील संकटातही
आपलाच माणूस जगावा
मधुर अशा नात्यांमधील
लॉकडाऊन नकळत निघावा

®D

-


Fetching रोहित बाळकृष्ण दुधवडकर Quotes