माझ्या आत बरंच आत
मी आणि तूच फक्त...
माझ्यासोबत पळताना
थकलेल्या विचारांचा ढीग,
निरर्थक अपेक्षांनी
गंज चढलेलं एक मन,
माझ्या आत बरंच आत...
आयुष्याला शिवून
बाहेर आलेला तडजोडीचा
तो दोर,
जगण्याच्या नशेनं
भरकटलेलं, काहीसं
हतबल झालेलं रितेपन
माझ्या आत बरंच आत...
हे सगळं सामावून
घेण्याची कठोरता,
एक देदीप्यमान ऊर्जा,
कमालीचे आत्मविलोपन
माझ्या आत बरंच आत....
©Rohini K.Dhawale
-
Rohini Dhawale
(©Rohini K.Dhawale)
39 Followers · 30 Following
Joined 28 March 2019
24 SEP 2021 AT 11:47
1 AUG 2021 AT 17:34
जहां को तो सुदामा जैसे मित्र की तलाश है,
मगर,
मेरे पास तो कर्ण जैसा दोस्त है.!!
-
29 JUN 2021 AT 10:41
सब कुछ खोने के बाद भी आप में आपका शरीर और मन बच जाता है. इससे आप फिर नई दुनिया बसा सकते हैं - भगवान बुद्ध
-
20 JUN 2021 AT 19:55
#बाप
🦅गरुडाप्रमाणे झेप घेण्यासाठी
या पंखात अजस्त्र बळ
टाकणारा बाप...
🌊समुद्रासारखं अथांग
होण्यास शिकवणारा बाप..
🕊आकाशात मुक्त स्वैर उंच
भरारी घेण्यास
स्वातंत्र्य देणारा बापचं..
-
29 MAY 2021 AT 14:34
#आपण
जोपर्यंत या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकत राहतील आणि जोपर्यंत या आकाशातील सूर्य चंद्र तारे चमकत राहतील.
तोपर्यंत आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू...-
14 MAY 2021 AT 11:51
Eid al-Fitr (عيد الفطر) also called the "Festival of Breaking the Fast"
or Lesser Eid, or simply Eid..
#eid_alfitr
Eid ul-Fitr Mubarak!
I wish a wonderful Eid day for you and your family.-
9 MAY 2021 AT 11:30