Rk Purajwar  
0 Followers · 15 Following

Joined 25 September 2020


Joined 25 September 2020
4 OCT 2023 AT 10:47

लोकांच्या उपयोगी पडणं ही आदरास पात्र कृती आहे यात शंका नाही.

परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात. दुसऱ्यांसाठी धावत जाण्याआधी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आद्यकर्तव्य.

तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवधान दुसऱ्यांसाठीच वापरून संपवलंत तर तुमच्यासाठी काहीच उरणार नाही.

-


30 JUN 2023 AT 17:05

माझा बाबा रिटायर्ड होतो आहे...😌♥️

आज माझे बाबा सेवानिवृत्त(रिटायर्ड) होत आहेत
गेली ३७ वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग नायगाव येथे सर्व्हिस केली अनेक चढउतार पाहिले अनेक संकटे पेलली. महत्वाचं म्हणजे खुप चांगली आपुलकी ची माणसं जोडली. आज का कुणास ठाऊक,  माझं अंतःकरण जड झालंय.  कारण, रोज ठरलेली दिनचर्या उद्यापासून पूर्णविराम घेणार आहे.असे म्हणतात, की बदल हा निसर्गाचा नियम आहे. तरी त्यांनी त्याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य समजलं  आणि निसर्गाचा नियम त्यांनीसुद्धा पाळला. दुसऱ्याला मदत करायचा गुण अन कामाबद्दल असलेली प्रामाणिकता नेहमीच आमच्या पुढील प्रवासासाठी दिशा देणारी ठरेल. कुटुंबावर आलेल्या संकटावेळी "मी आहे ना" हे शब्द नेहमीच संजीवनी सारखं काम करतात.
सदैव सकारात्मक कितीही बिकट परिस्थिती असली तरी भक्कपणे पाठीशी उभे राहन खरं तर काय लिहावं हे सुचत नाही. कारण हे शब्दात मावणार नाहीये हे नातंच वेगळं असत मुलाचं आणि वडिलांचं.
♥️"वडील"♥️
तीन शब्दांच अक्षर असलं तरी खूप मोठं आहे
बाबा तुम्हाला सेवनिवृतीच्या शुभेच्छा तुमचा आशीर्वाद अन पाठबळ आमच्या पाठीशी नेहमीच असेन....🙏

-


3 DEC 2020 AT 20:59

तो वकील असतो .... !!!
शाळेत भले असो सरासरी गुणवता , हुशार मुलांमध्ये शोधूनही सापडत नसेल त्याचा पत्ता , पण तरीही सर्वांच्या मनावर राज्य करतो तो वकील असतो ! घरामध्ये नेहमीच नालायक ठरतो , आईच्या डोक्याला ताप होतो , बाबांचा बीपी वाढवतो , पण तरीही उतारवयात त्यांचा आधारस्तंभ होतो , तो वकील असतो ! समाजामध्ये तो उपद्रवी वाटतो , घरांघरांमध्ये वाद घालणारा कळीचा नारद भासतो , पण तरीही समेट करायला तोच हवा असतो , तो वकील असतो ! सभेमध्ये सूरुवातीला शांत असतो , मान खाली घालून निवांत असतो , पण तरीही सभेच्या अखेरीस जो रजनीकांत ठरतो , तो वकील असतो ! खेळताना सर्व काही पणाला लावतो , आजूबाजूचं जग विसरतो , खुशाल मित्रांना शिव्याही देतो , पण कसंही जिंकणं हेच ज्याचं ध्येय असतं , तो वकील असतो ! एखाद्या तरी कलेशी त्याची दोस्ती असते , आयुष्यभर त्यानं ती जपलेली असते , एकुणच अष्टपैलु ज्याचं व्यक्तीत्व असतं , तो वकील असतो ! पोरगा डॉक्टर झाला कि गुणगान होतो , इंजिनीअर झाला कि मान असतो , पण आपल्या ज्ञानाच्या बळावर ज्यास सन्मान मिळतो , तो वकील असतो ! कोर्ट हे त्याची शान असते , वकिली ही त्याची जान असते , आपल्या अशिलास मिळावा न्याय हेच ज्याचं ध्यान असते , तो वकील असतो !
-एक वकील

-


31 OCT 2020 AT 18:53


चालत चालत भटकलो , तर साथ देतय कोण?

नेहमीच ठेच लागल्यावर , हात देतयं कोण?
-बाप.....!
💝💝💝

-


18 OCT 2020 AT 20:46

"ठेच"
मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !
कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी,सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी भीती वाटावी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं! परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा काही ठिकाणी तर त्याला घाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कुणाची तरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत इतका अफाट त्रास व्हावा.! अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं.अन् मग बघावं ह्या वेदनांतून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच रसायन.ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त "आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय" या एकाच तत्वावर"ज्याचा कितीही विश्वासघात झाला, अपमान पदरी आला, फसवणूक झाली तरी हारण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच भीक घालत नाही. ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो.
"ठेच..!" एक अनुभव
जीवनाचा एक अध्याय

-


25 SEP 2020 AT 8:03

#पश्चाताप अन प्रवास...✍️
आपण आपल्या प्रवासात फक्त वाईट गोष्टी आणि दुःख यांचा विचार करत राहतो.पण खरंतर या गोष्टी घडतात ते आपल्या  ध्येयाला मार्ग मिळावा म्हणून आजूबाजूची प्रत्येक गोष्ट , घटना आपल्याला काही ना काही सांगत असते. कधी कधी आपल्याला बदलन्यासाठी भाग पण पाडते फक्त आपल्याला ती ओळखायची सवय नसते. असो पण असावी आणि त्याप्रमाणे आपला प्रवास चालू ठेवायचा असतो.कधी कधी क्षणिक सुखं आपल्याला खूप आनंद देत , तेव्हा वाटतं की तिथून हलूच नये पण ते किती काळ राहील ? हे माहित पण नसतं म्हणून वैताग येतो कधी कधी या शापित जगण्याचा आणि माझ्या या असल्या स्वभावाचा . करायचं काही तरी वेगळं असत आणि काहीतरी भलतंच होऊन जातं . गंभीर विषय तेंव्हा  होतो जेंव्हा आपण  प्रामाणिक भावनांचा पुरावा नाही देऊ शकत . मग सुरू होते मनामध्ये ती  घालमेल , चिडचिड आणि मनाला शांत करायचा खटाटोप.असो आपल ध्येय आपल्याला मिळालं नाही तर आपण आयुष्य भर सुखी राहू का ?  मग अश्यावेळी आपला निर्णय ठरवत की आपण कोणत्या दिशेला चालायचं क्षणिक सुखाचा भोग घ्यावा कि ते  टाळून ध्येयाची वाट धरावी..🚶‍♂️☺️

-


Seems Rk Purajwar has not written any more Quotes.

Explore More Writers