एक मतला एक शेर…..
मी मनाजोगे तयांच्या वागली नाही..
याचसाठी ते म्हणाले चांगली नाही..
चांगली नाही तरी मी चांगली आहे
मूर्ख लोकांच्या मुखाला लागली नाही..
_ वृषाली मारतोडे-
इतकं सहन केलं मी....
असं सांगून,
नाही मिळवली मी कधी
कोरड्या दुनियेची
कोरडी सहानुभूती...
आणि कधीच
करताही आलं नाही
मला या तुच्छ दुःखाचं
भांडवल.....
धो धो पाऊस बरसावा
तशी एकदाच बरसते
आणि
मग नदीला पुर येवून
वाहून जावी सर्व घान
तशा सर्व तुच्छ आठवणी
वाहून जातात एकदाच..
आता नका विचारू
कशी आहेस तू...???
प्रेमाची उधळण करून
एका प्रेमाच्या शोधात आहे मी...
- वृषाली-
चुकलं तिथे रागवते ती
या जीवनाचे धडे शिकवते..
तिला मावशी म्हणते मी
पण ती तिच्यातली माय निभवते..
-
रक्ताची नाती खोटी
तुझी मैत्री तेवढी खरी
विसरले नाही तुला मी
जरी येत नाही घरी..
- वृषाली-
अनपेक्षितपणे तूच दिला
मला मदतीचा हात..
तुझ्यामुळेच झाली ताई
माझ्या आयुष्याला सुर्वात..
- वृषाली-
प्रेम म्हणजे समर्पण
प्रेम म्हणजे संजीवन झरा..
निस्वार्थी प्रेम करणारा
मिळवा एक तरी खरा...
-
तुझ्या साठी पावसा
व्याकुळल सार रान..
घेवून ये रे पावसा..
आता हिरवाईच दान..
-
उगाचच प्रेम करणारे इथे मी खूप पाहिले
जगाचे या खरेखोटे असेही रूप पाहिले..
खुलाशाला किती तो बरळला प्रेमातली गाणी
खरोखर प्रेम करणाऱ्यास तर मी चूप पाहिले..-
सारेच सोडून पाहतात
वाहत्या पाण्यात नाव,,,,
आयुष्य म्हणजे नवे ग.....
पाठमोऱ्या ठीकरीचा डाव-