विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
सुंदर ते रूप तुझं
कटेवरी हात ठेवूनी
विठेवरी उभा..
कानी कुंडल मकराकार
गळ्यात शोभे तुला तुळसीहार,
भक्तासाठी धावूनी येशी
असा तू पंंढरीराया...
सावळं हे रूप तुझं पहायला
भक्तांची ही गर्दी होई,
आषाढी कार्तिकीला
सारी पंंढरी ही दुमदुमून जाई...- ©राकेश डाफळे.
12 JUL 2019 AT 8:55