पालटले रूप तरारल्या शाखा सरींवर सरी कोसळल्या
ओलावले दिस लकाकल्या दिशा नदी ओढ्यांच्या वाटा
खळाळल्या
-
ऐक ना तुझ्याशी थोडं बोलायचय मला
येईल कधी गेला पाऊस विचाराचय तुला
लाडीगोडी तुझ्याशी करायचीय मला
ऋतूतले पहिले फुल द्यायचंय तुला
साद दिली प्रतिसाद देशील ना मला ?
खुले काळीज करून दावयाचय तुला
झुकल्या नजरांचा होकार मिळेल का मला ?
कुपितल्या अत्तराहून जपेन मी तुला-
झोपडीत गरिबाच्या आता रोजचा अंधार
पाण्याखाली बुडत्यास काडीचा आधार
कात टाकून जुन्याची कसे होऊ आता पार ?
उगवत्या सूर्यासंगे जुना रंगेल संसार ?
दैन्य अघोरी विनाशी देवा करा संहार
दुनियेला द्या बा तुम्ही जीवदानाचा उपहार-
सांगून येत नाही ढग आठवांचे तुझिया
होण्यास चिंब मनाला रोखू कसा माझिया
सांगून येत नाही अश्रूधारा नयनी माझ्या
होतो का कधी ओला तुझ्या डोळ्याचा गं कोना-
बंधने तोडून जोडू स्वप्न रेशमी सखे
भेदून कोश कालचे जन्मली फुलपाखरे-
ज्ञान कवाड प्रकाशी
ज्ञान जाळे अंधार
ज्ञान कवाड विकासी
ज्ञान जाळे अज्ञान
ज्ञान प्रेमांकुर जगी
करी द्वेषाचा विनाश
ज्ञान विश्वास उद्धारी
ज्ञान मोक्षाचे ते द्वार
-
परिचारिका रुग्णसेविका
चुकवीती फेरा कालरात्रीचा
रोग नाशती त्या रुग्णाचा
धीर देत जागवीती आशा
दोन हात करिती योद्धा
"दीर्घायुषी भव" परिचारिका
परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
Love U "Sister" !!!!-
मनात आलं सहज म्हणोनी
फुलवून पिसारा उडलो मी
कधी झाडावर वेलीवरुनी
वाऱ्यावरती झुललो मी
चिमणा दाणा चिमण्या चोची
चिमणे घरटे आकार घेई
पैसा अडका जाती-पाती
भ्रांत उद्याची तयांना नाही-
मरा मरा जप...भले...राम राम होय
अंग संग किचड के...भाये कमलकाय
श्रीराम नवमी की सभी को ढेर सारी बधाईया !!!!-