होता तो....
कोण होता तो?
कोणाचे खोटे तर कोणाचे खरे आसवं बनुन वाहत होता तो..
तीन बाय तीन सहा फुटाच्या इवलुष्या जमिनीत मावत होता तो..
आईला सावरत रडणाऱ्या बहिणीचा भाव होता तो..
दातखिळी बसून सुन्न पडलेल्या पत्नीचं नाव होता तो..
छाती बडवत रडणाऱ्या आईची बाग होता तो..
डोक्याला हात लावून बसलेल्या एकही अश्रू न गाळणाऱ्या बापाचा वाघ होता तो..
वेड्यासारखा इकडेतिकडे बघणार्या भावाचा आधार होता तो..
लहानपणी उचललेल्या आजोबांच्या खांद्यावरचा भार होता तो..
मैत्रीतल्या दुनियेतला यार होता तो..
जगण्यासाठी आयुष्यातला सार होता तो..
अखेर..
होता तो.
-