ओ दिखी नही,
अभी मेरी ईद बाकी है...-
जगलो असा की,
मेलो जरी आता मी
तरी मजला खंत नाही
मेलो जरी , तरी मी,
राहीन जिवंत कामातुनी
माझ्या मी..-
बाळ : बाबा कविता म्हणजे काय ?
बाबा : बाळा तुला मोठा झाल्यावर समजेल
बाळ : बाबा मी मोठा केव्हा होईन ?
बाबा : बाळ, जेव्हा तुला कविता समजेल...-
बाई...
बाई तू फक्त बाई नसून,
विसरू नकोस की,
तू साऊ ची लेक व
जिजाऊ ची ज्योत आहेस..म्हणुनी
विसरू नकोस तुझा वारसा लढण्याचा,
समाज घडविण्याचा...
कारण, आज ही गरज आहे या गोष्टींची...
या पितृसत्ताक व्यवस्थेला लाथ मारण्यासाठी,
गाजलेली, गंजलेली, बुरसटलेली, मक्तेदारी मोडून काढण्यासाठी,
तुला तुझं नवं शहर निर्माण करण्यासाठी,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,
तुझ्यातल्या बाईपणाला सारून तुझ्यातल्या माणूस पणाला समृद्ध करण्यासाठी...
बाई पण माणूस असते हे स्वीकारण्यासाठी...
आणि बाई"माणूस" म्हणून जगण्यासाठी..!
कारण तू या सृष्टीची निर्मीती सोबतच
तू या सृष्टीची निर्माती आहेस...
बाई"माणूस" म्हणून जग याच शुभेच्छा..!-
छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की प्रत्येकाच्या अंगात एक विशेष बळ येतं. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आणि काबीज केलेल्या मोहिमा, गनिमी कामा, स्वराज्य हे सगळं ऐकताना एकदम भारी वाटतं. त्या शिवकालीन कथा कितीही ऐकल्या, वाचल्या तरी प्रत्येक वेळी तितकाच रोमांच उठतो..हे सगळं पूर्वीच्या पिढीने अनुभवलं, आत्ताची पिढी अनुभवतेय आणि येणाऱ्या पिढीने ही अनुभवायला पाहिजे त्याकरीता या शिवगाथा पिढ्यांपिढया जिवंत राहिल्या पाहिजेत म्हणून आपण प्रयत्नशील राहूया आणि छत्रपतीं शिव-शंभु महाराजांच्या विचारांचा आचरणकर्ता म्हणून कार्यशील राहूया..!
-
बघ तुला येता येत का..?
मी सोडुनी आलोय माझ्यातल्या पुरुषीपणाला..
तूला तुझं बाईपण सोडून येता आलं तर,
मी आहे इथच उभा...
स्त्री-पुरुष समानतेच्या उंबरठया बाहेर...!
आलीस तर,
सोबतीने स्त्री-पुरुष परस्पर पूरक
उंबरठा ओलांडून आत प्रवेश करू...
आणि
जरा विस्तारू चौकटी समाजाच्या..
बघ येता आलं तर...
मी आहे इथंच उभा..-