25 JAN 2019 AT 11:13

प्रेम म्हणजे नक्की काय...
सध्या च्या जगात लोकांनी प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे,
अरे प्रेम म्हणजे एक पवित्र दोन जीवांच बंधन, म्हणतात ना दोन जीव एक श्वास, जस प्रेम होत राधाकृष्णाचं प्रेम हे निस्वार्थी मनाने करावं, प्रेम म्हणजे तिला जी गोष्ट आवडत नाही पण मला ती गोष्ट आवडत असून त्या गोष्टीचा त्याग करणे म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे, एकमेकांच्या सुखदुःखात आधार देणे,एकतर्फी सुद्धा प्रेम असू शकत,समोरच्याने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे असं नाही मी निस्वार्थी मनाने प्रेम केलं म्हणजे तेच खर प्रेम होय,
भले ती माझ्या आयुष्यातून निघून गेली पण तिला काय कळणार प्रेम म्हणजे काय असत, प्रेम म्हणजे तू आणि मी नाही तर प्रेम म्हणजे आपण हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला प्रेमाची व्याख्या कळेल..

- प्रथम जाधव