Priyanka Jadhav   (#_पिeeu_)
355 Followers · 9 Following

काय लिहू....
Special अस काही नाही...😜😄
Joined 11 June 2017


काय लिहू....
Special अस काही नाही...😜😄
Joined 11 June 2017
16 JUL 2024 AT 21:14

नकळत का होईना माणसे
आपल्याला आपली जागा दाखवतात
तेच बघून समजून आपणही
आपल्या जागेवर राहण्याचा प्रयत्न करावा
उगाच 'माझ माझ' करत
गावभर बोंबलत फिरण्या पेक्षा
वास्तवात जगण्याचा प्रयत्न करावा
छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा
खूप काही सांगून जातात
स्वभावातील बदल तर
खूप काही बोलतात
नकळत का होईना माणसे
आपल्याला आपली जागा दाखवतात

-


16 JUL 2024 AT 19:39

वरवरचा देखावा
काय तो कामाचा
मनात एक ओठांवर एक
असा तो दाखवायचा
माणसाच्या भावनांना
ठेच पोहचेल
अस वागायचं नी बोलायच
बोलता बोलता
उगाचच मन दुखवायच
असा वरवरचा देखावा
काय तो कामाचा

-


16 JUL 2018 AT 21:24

अंकुर हे झळकलं
बीज बोयल्याच फळं ते आलं
मातीत रुजुन मातीला अलिंगन दिलं
तुझ्या सहवासाने साध्य हे झालं

आभाळाची छञछाया
साऱ्या बीजांचा तो बाप
डोईवरचा मायेचा हात
जगण्याचा तो आधार

अंधाराची सावट
रातकिड्यांची ती किरकिर
काजव्यांचा मिनमिनता प्रकाश
आपुलकीची ती ज्योत

प्रभातकाळचा सुर्यप्रकाश
पुन्हा जगण्याची आस
अंकुरातुन बहरण्याची
वेगळीच ती आस
#_पिeeu_

-


19 JUL 2017 AT 23:41

पाहताना तुला चोरट्या नजरेने
हळुच तु पाहील मला संशयाच्या नजरेने
कळले तुला पाहत आहे मी तुला
पण कधी कळेल तुला
काय आहे माझ्या मना...

-


13 JUL 2017 AT 23:46

भरलेल्या ताटात एक तरी वाटी
रिकामी असावी
तेव्हाच तर दुस-याच्या ताटा कडे बघुन
आपल्या ताटात काय कमी आहे
ह्याची जाणीव होईल

-


16 JUN 2017 AT 11:08

मंद वाहणा-या झ-याकाठी
शांत बसाव...
त्या वाहणा-या झ-याकडुन
आपणच कीहीतरी शिकाव
दगड-मातीचा प्रवासातही
खळखळुन वाहतो...
आजुबाजुचा झाडांना
मंञमुग्ध करून जातो...

-


17 MAY 2021 AT 1:16

जो पर्यंत एकटे आहात
आयुष्य जगून घ्या
एकदा काय वाट लावणारी
मानस आयुष्यात आली ना
की जगण्याच वाटोळं होत

-


14 MAY 2021 AT 0:29

शब्दाची जादू
तूला काय कळणार
दोन शब्द वाचताना
जीभ कशी वळवळणार

जिभेचे चोचले पुरवताना
मनेही दुखावली
शब्द उच्चारुनही
गप्प नाही बसली

काय ह्या जिभेचे चोचले
शब्द काही सुटत नाही
पुरवायचे किती
हे शब्दांनाही कळत नाही

-


14 MAY 2021 AT 0:13

विनोदी कविता करताना
डोक्याचा झाला भुगा
अन लिहिता लिहिता
विनोदाचा भागच लिहायचा राहिला

-


14 MAY 2021 AT 0:00

अंधार अंधार आणि फक्त अंधार
अंधाराच्या सोबतीला कुठेतरी
मिणमिणता तारा...
काही तरी असल्याचा दिलासाच जणू...

-


Fetching Priyanka Jadhav Quotes