Pratik Patil   (प्रतिक)
166 Followers · 16 Following

@patil.pratil_7
Joined 3 April 2020


@patil.pratil_7
Joined 3 April 2020
8 DEC 2022 AT 0:01

There is emotional attachment with you YQ. My writing journey started from here ❤️. Your motivation for writing, your all beautiful topics to write kept my writing alive. But sadly we users failed to keep alive YQ 🥺,,,, YQ baba, YQ taai, YQ didi,,, Your are our teachers, you teach many things. Your mid-night poems, Writing gyaan writing challanges, YQ meme challange I will miss a lot ,,, those amazing templates for different topics those suggestions of topics. ,,,, YQ THANKS FOR BEING AN IMPORTANT PART OF MY JOURNEY,,,, AS I FOUND MY WORDS BECAUSE OF YOU
THANK YOU ❤️❤️❤️❤️❤️❤️
I wish you very all the best for whatever you will do, I know the real art + tech lovers like you will create something creative again and will gather all Writing lovers again,,, all the best and thanks to you guys who made our writing home

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
#yqbaba #yqtaai #yqdidi #yourquote #YQ #YourQuote

-


30 AUG 2021 AT 1:43

नुकतीच केली होती लेखनास सुरुवात
लिहू लागलो होतो काही सुचेल ते जोमात
लिखाण टाईप करण्यासाठी टेम्प्लेट शोधत
मी play store गाठले अन् सर्च करताच
वरती your quote app आले
डाऊनलोड करून साईन अप जेव्हा केले
तीन पाहिले गुरु मज लेखक म्हणून मिळाले
Yq baba yq taai आणि yq didi
टेम्प्लेट साठी आलेलो मी, झालो या अॅप चा दिवाणा
लेखनासाठी विषय असो, किंवा रोजच्या midnight poems
Yq memes तसेच yqbaba writing gyan
या साऱ्यांसोबतच घडतोय, काहीसे वाचत काहीसे लिहत.
माझ्या लेखन प्रवासातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला माझा साथी..

Thank you very much yourquote♥️
You are planting writers♥️

-


23 AUG 2021 AT 23:51

मज न कळला अर्थ हा,
लेखणीच्या मौनाचा!
भावनांच्या नीरस व्यक्त होण्याचा!!
नीरस वाटून जाताहेत का हे क्षण??
जगून सुद्धा राहताहेत का हे क्षण?
भरले आहे तरी खालीच का हे मन?
हुरहुरले आहे म्हणून फक्त आनंदीच का हे मन!!!
पण,
तयास आता ओळख आहे भरून वाहण्याची;
तयास आता ठाऊ क आहे शाई जणू गाण्याची;
त्या काळोख्या रात्री तयाची सोबती आहे शाई लेखणीची,
तयास आता आतुरता आहे नव्या लिखाणाची..!!

-


22 APR 2021 AT 22:52


त्या तेथे टेकल्यासारखे वाटतेय आकाश !
भव्यतेच्या जाणीवेसह का कुंपणात वेढल्यासारखे वाटतेय आकाश?
या डोंगराच्या पश्र्चात का लपल्यासारखे भासतेय आकाश?
काळोखी ढग जमवत आभाळ सारे पिंजून काढतेय आकाश!
भडभळ कधी मोकळे होऊन, कधी गोठून जातेय आकाश!!
रिमझिम कधी चाहूल ठेवत, मनी सारखे दाटतेय आकाश..
निरभ्र काळोख्या रात्री पुन्हा; चंद्र ताऱ्यांनी सजतेय आकाश..
मग, प्रखरात का पुन्हा काळोखी भासतेय आकाश??
सूर्य तेजात जरी चमकूनी निघतेय आकाश!!
चंद्र शितलतेत वाट दाखवतेय आकाश..
लुकलुक करीत, कधी लख्ख होत मनी सारे जमतेय आकाश...
मोकळे उजेड पाडेल आकाश,
कुंपणातून सारे सुटेल आकाश,
डोंगराआडचे पुन्हा दिसेल आकाश;
परि
थोडा अवकाश !!!

-


17 APR 2021 AT 20:22

बंदिश ठुमकती जब त्रिताल से,
मन ताल ठहराव से लिपट जाएं।
गीत सूरों से, सुर ताल से,
त्रिताली बंधन ओढ़त जाएं।

तीन समों की थाप लहराएं;
गीतों के मुखड़े फ़िर मन बहलाएं।
सोलह मात्रा इति: मर्यादा,
सम, काल से रंग सज आए।

छोटा खयाली गीत तोहरे,
मन की बस्ती ने पूर्ण ठहरे।
एक शृंगारी लय में गाकर,
जीने में भी ताल भर लाएं।

धा धीं धीं धा। धा धीं धीं धा ।।
धा तीं तीं ता । ता धीं धीं धा ।।
बोली तोहरी मधुर घन लाएं,
तबले पर बजाए जब तबलजी;
गीत मोरा जैसे घुलमिल जाए।

-


21 MAR 2021 AT 16:38

कविता, जिथे शब्द होतात साजिरे..
कविता, जिथे अर्थ होतात गोजिरे..
कविता, जेथे मन विरघळते पुरते..
अन् विरघळलेल्या मनात पुन्हा शब्दांमृत स्फुरते.

कविता, जी न लिहिली जाते,
कविता, जी न लिहिता येते..
कविता, जी फक्त होते, आतून येते,
कसे, माहित नाही...

कविता, जिथे सारेच शमते..
कविता, जेथे फक्त अंत: करण उरते..
कविता, जेथे मन दिलखुलस बोलते!
अन् वाचता पंक्ती वारंवार, नवनवीन अर्थ ते शोधते.

कविता, जी न वाचली जाते;
कविता, फक्त वेचली जाते, काव्याने तहानल्या डोळ्यांनी...
कविता, जी न साठवली जाते..
आयुष्यभर पुरेल इतकी जगली जाते!!

कविता, भाषेस समृद्ध करते..
कविता, भाषेच्या अथांग महासागरात दिलखुलास पोहते..
कविता, भाषेच्या निरनिराळ्या अलंकारांनी सुंदर सजते..
मोहून टाकते इतके की, जेथे सारेच संपते...

-


23 FEB 2021 AT 0:02

काहूर की हुरहूर?

-


3 FEB 2021 AT 0:12

नजरेतून....

-


2 FEB 2021 AT 22:53

नजरेतून हल्ली बोलतो मी सारे
नजरेतून हल्ली सांगतो मी सारे
भोवती आहेत भिरभिरणारे अगणित वारे
नजरेतून हल्ली स्थिरावतो मी सारे

नजरेतून हल्ली शोधतो मी सारे
नजरेतून हल्ली रोखतो मी सारे
उलट्या दिशेने चालणारी ती चाके
नजरेतूनच हल्ली वेधतो मी सारे

नजरेतून हल्ली मागतो मी सारे
नजरेतूनच हल्ली खेचतो मी सारे
दुभंगणाऱ्या वाटांमध्ये फुलणारे सुंदर ते पीसारे
नजरेतून हल्ली रेखतातो मी सारे

नजरेतच खुणावतो मी हल्ली
कधी होऊनी जातो मी अवली
स्वच्छंदीपणाच्या मुक्त आलापी
अधून मधून जगतो मी हल्ली

-


7 JAN 2021 AT 12:04

और आजकल...


caption*

-


Fetching Pratik Patil Quotes