खास त्याला भेटायला, एक रात्र रोज यायची,
चांदण्यां सवे चंद्र तार्यांची, चादर सोबत आणायची..
दिवसा त्याला बसायचा, कडक उन्हाचा गरम मारा,
रात्र सोबत आणायची मग, शीतल सावली गार वारा..
अशी हि रात्र बहरून येता, तो शांत झोपी जायचा..
एकटीचा मग रात्रीचा, वेळच नाही जायचा..
वागण्याला त्याच्या या, रात्र मग कंटाळली..
सोबत चंद्र चांदण्यांची तिने, मुद्दामच मग टाळली...
बघता बघता तिच्या मनाची, होऊ लागली जरा निराशा..
होईल काही त्याच्याकडून!! हीच तिने सोडली आशा..
संतापून अचानक मग एकदा, ती गर्द काळोखी दाटली..
पहिल्यांदा तेव्हा त्याला ती, रात्र वैऱ्याची वाटली..
पहिल्यांदा त्तेव्हा त्याला ती
रात्र वैऱ्याची वाटली..
-
अवघड झालंय कोडं रात्रीचं,
काही केल्या सुटत नाही..
डोळे म्हणती निज जरा,
पापणी मात्र मिटत नाही..
-
किती गेलं ?? किती आलं ??
मला काही कळलंच नाही,
आयुष्याचं गणित,
मला कधी जुळलच नाही..-
हरतो जिंकण्याचा विचारही जेव्हा,
हाताशी उरतो फक्त अनुभवाचा ठेवा..
-
तुझ्या आठवणींचा वृक्ष
आता पूर्णपणे सुकलाय,
आभाळाला टेकून तो
पुन्हा जमिनीकडे झुकलाय-
तिच्या चेहऱ्यावरचं हसू
हल्ली कुठेतरी हरवलंय..
तेच शोधून आणायला मी
माझं मन पाठवलंय..-
घाव तिच्या ओठांवरचा
जिव्हारी त्याच्या लागला होता..
पुन्हा एकदा आज तो तिच्याशी
अनोळख्या सारखा वागला होता..
-
देहविक्री करणाऱ्या महिलेला सुद्धा
एक सुखी संसार हवा असतो..
म्हणूनच तिच्याकडे येणारा यजमान
रोज नवा असतो..
-
महाकाव्य वाचायची सोडून आपण त्यांना धर्मग्रंथ बनवलं आणि स्वतः झालो अश्वत्थामा.. लागलो फिरू मुक्तीच्या शोधात
-
भले नसेल पटत
तुझ्या खोट्या पुरुषार्थाला,
तरीही..
उमलण्या आधीच
खुडू नकोस तू
मुक्या काळ्या..
कारण त्या
उमलतील, फुलतील, बहरतील,
आणि दरवळतील आसमंत सारा,
गाईल गाणी त्यांचीच फक्त,
हा उनाड बेभान वारा..
नको फसू तू जरासाही
आजवरच्या त्या फसण्याला,
अरे त्यांचीच ओळख असेल मग
बघ तुझ्याहि असण्याला..
ते बघ "जाई" चं झाड..!-