Prathamesh Samant  
8 Followers · 5 Following

Joined 27 November 2018


Joined 27 November 2018
6 JUL 2023 AT 12:48

असत्ये सत्य विठ्ठल, अधर्मे धर्म विठ्ठल |
पापासी पुण्य विठ्ठल, अंगीकृत तो जाहला||

चिन्मय गवंडी.

-


31 MAY 2023 AT 1:15

भरून येतंय पण बरसत नाहीये...
पुरुषासारखं वागतंय हल्ली आभाळ...

-


26 MAY 2023 AT 0:10

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे आजचा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा झाला. तुम्ही मला फोन करून, संदेश पाठवून किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आपणा सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. असंच प्रेम, माया, जिव्हाळा अविरत कायम राहू दे. काही पोस्टना मी वैयक्तिक रित्या प्रतिक्रिया देऊ शकलो नाही त्याबद्दल माफ करा. (नजरचुकीने राहिलं असेल)
पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद... ❤️✨

-


21 APR 2023 AT 23:27

"तुझ्या बरोबर नसेन कदाचित, पण तुझ्या सोबत कायम आहे..."

ह्या बरोबर आणि सोबत यातला फरक समजला की आयुष्य समजलं.

-


15 APR 2023 AT 21:54

काव्यातून ती कविता निघाली, कोलाहल जाहला...
सावळ्याचीही 'सावली' विरली, एकाकी 'सावळा' झाला...

-


13 MAR 2023 AT 0:22

आजकाल माणसं कधी "off" होतील याचा भरवसा नाही..
Mobile तर बिचारं यंत्र आहे...

-


26 FEB 2023 AT 18:42

वेळेने समर्पक उत्तरावे, कळता न कळता...
मन अश्रुंवाटे साफ व्हावे, तव आठवणीत रडता..

-


2 JAN 2023 AT 21:19

नुसती स्वप्नं बघून काही होत नाही त्याला मेहनतीची जोड हवी |

कवेत घेशील आभाळ सारं, मिठी मात्र घट्ट हवी...||

✍🏻 अमेय जोशी...

-


17 NOV 2022 AT 7:24

नदीनं अमर्याद वाहत जावं, पण समुद्राने मात्र हळुवार कुशीत सामावून घ्यावं...

-


3 NOV 2022 AT 8:39

तथाकथित थोरामोठ्यांनी दिलेली झापडं दूर केली की "लक्ष" सुधारतं आणि "लक्ष्यही"...

-


Fetching Prathamesh Samant Quotes