Prathamesh Jadhav  
284 Followers · 4 Following

Joined 18 June 2020


Joined 18 June 2020
24 OCT 2021 AT 10:49

जिस्म से साया चुराया उन्होंने कुछ ऐसा,
जैसे खुदा ने इश्क का इजहार जताया मासूमसा.

-


17 OCT 2021 AT 13:18

देखावे अनंत ताऱ्यांचे उजळावे ऋतूगर्भात,
जेथे सजावे खरे जगणे या जगताचे.
निजावे कुठेतरी चांदण्याच्या शांत डोहात,
जेथे नसावे कुठलेच बंधन या जगताचे.

-


7 OCT 2021 AT 17:10

*बरसात ही*
बरसात ही तिच्या अमृतथेंबापरी गोडस बरसणारी,
जणू तिच्याच नयनसुखांपरी लोभस दिसणारी.
बरसात ही तिच्या सुलोहक रूपापरी पहाट उजाडणारी,
जणू तिच्याच मोहक नजरेपरी रात सजवणारी.
बरसात ही तिच्या नाजूक स्पर्शापरी फुले खुलवणारी,
जणू तिच्याच साजूक हास्यापरी आठवणी जागवणारी.

-


26 SEP 2021 AT 9:04

*वाट पुन्हा ती*
वाट पुन्हा ती चाललो मी आज,
तिच्या आठवणी मात्र तश्याच ताज्या होत्या.
त्या वाटेवर माझे पाऊल थबकले सारे,
तिच्या पैंजणांचा आवाज तसाच गुंजत होता.
भीती अजूनही तशीच होती मनात,
जेव्हा तिचे हात माझ्या हातात गुंतलेले.
मनात भाव माझे खूप सारे दाटलेले,
तरी निःशब्द त्या वाटेने सारे काही समजून घेतले.

-


23 SEP 2021 AT 23:37


शून्ययात्रीपरी एकटाच एकांतात वावरत तर कधी
गर्दीतदेखील स्वतःला विसरत,
जगत असतो माणूस.
अथांग प्रेम करीत त्या नात्यांना तर कधी
त्याच जवळच्या नात्यांना शिसारी आणत,
जगत असतो माणूस.

-


22 SEP 2021 AT 8:06

भेट आमची काहीशी चंद्र अन ताऱ्यांसारखी,
मी काहीसा तुटणारा ताऱ्यापरी तर ती चंद्राच्या तेजस्वी नूरासारखी.

-


14 SEP 2021 AT 23:06

आठवणींच्या डोळ्यांत सुखाचे पाणी आणणारे क्षण तिचे,
जणू माझ्या शब्दांवर खुलत जाणारे प्रेमाचे काव्य तिचे.

-


12 SEP 2021 AT 15:04

*नक्षत्रांचे देणे*
नक्षत्रांचे देणे हे तिच्यासाठी स्वप्नाळलेल्या प्रदेशांत विरतात,
जणू तिच्या एका स्वप्नदृश्यासाठी हे रातीत स्मरतात.
नक्षत्रांचे देणे हे तिच्यासाठी गाफील क्षणांत सजले.
जणू तिच्या अंतरास्पर्शाने कस्तुरीमृगाचे आसवे विरघळले.
नक्षत्रांचे देणे हे तिच्याचसाठी शांत डोहात पावसाळी भिजले होते.
जणू तिच्याच श्वासांमध्ये हे गहिवरून लहरत होते.

-


8 DEC 2021 AT 18:20

Value the grief of a moon, he rises when everything gets dark.

-


28 NOV 2021 AT 16:23

जिस्म से साया चुराया उन्होंने कुछ ऐसा,
जैसे खुदा ने इश्क का इजहार जताया मासूम सा.

-


Fetching Prathamesh Jadhav Quotes