सीमा-सीमा वादांमध्ये
पेट्रोल-डीझेलच्या भावामध्ये
खेडोखेडी गल्ल्यांमध्ये
कविता असते जागी
नेते जेव्हा भांडत असतात
पैसे पैसे खेळत असतात
तळयात मळ्यात उडत असतात
कविता असते जागी
जाहिरातींचे डोंब असते
कामामध्ये गोम असते
दाखवण्याचे स्तोम असते
कविता असते जागी
प्रचाराचे फलक असतात
काळ्या नोटा मुबलक असतात
खिश्यामध्ये सेवक असतात
कविता असते जागी
दाखवण्यासाठी "फुल" असतं
कामावेळी गुल असतं
रात्री पूर्ण टुल असतं
कविता असते जागी
कविता सगळं बघत असते
तलवारीला घासत असते
एकेदिवशी क्रांती करते
कारण....कविता असते जागी
- काव्यप्रथम
-
prathameshawasare27
जिथे दूर अंधारती रोज वाटा
मनाच्या तळाशी जिथे खोल काटा
जिथे आजवर ना कुणी प्रेम केले
कळ्या पाकळ्यांचे जिथे कोंब मेले
सुनी सोनसावळ जिथे ना उन्हाची
जिथे ना हजेरी निशी चांदण्याची
मला ती कधी ना जिथे भेटली
वा तिच्याशी जिथे ना कधी बोललो
जिथे कष्ट भ्रष्टाहुनी स्वस्त होते
जिथे वाम कार्यातले फस्त होते
नदी पापण्यांच्या पूरांची जिथे
घरे रिती झावळ्यांची जिथे
जिथे मान्यतेला मिळे मानहानी
दिवा जागवावा अश्या रोज स्थानी
- काव्यप्रथम
-
मै कभी जरासा हस लेता हूं जिनपर उनको शौक नही
मै कभी जरासा लिख लेता हूं जिनपर उनको शौक नही
ये गुलाब खिलता देखकर हसना होता है दुनियामें
मै क्या उसे समझाऊँ आखिर जिनपर उनको शौक नही
ये दिवानी सी उलझन है, ये दिल दिवाना होने दो
मै क्या उसे दिखाऊ आखिर जिनपर उनको शौक नही
वो शोक भरा बैठा था, उपर पेड़ था अशोक का
मै क्या उसे हसाऊ आखिर जिनपर उनको शौक नही
ये दर्पण लेके आखिर वो इस शौक की बात बोल उठा
मै क्या "मुझे" सताऊ आखिर जिनपर उनको शौक नही
- काव्यप्रथम
-
जिथे फुलांचा सुगंध येतो
पाण्यावरती तवंग येतो
वंशवनाच्या बेंटामधुनी
जिथे तरुंवर वसंत येतो
जिथे कधी ही नव्हती लाही
वारा-वादळ पुरता वाही
जिथे स्वताःला गुंतून वेली
देती तुजला मजला ग्वाही
जिथे विचरती मुक्त पाखरे
पाण्यापाठी खडक पाझरे
पाऊसपाणी पिकता दिसती
उंचवटीवर मोर नाचरे
जिथे क्षणाला घडे सोहळा
इंद्रधनुचा सडा कोवळा
नंदादीपापरि तेवतो जिथे
कधीचा चंद्र सावळा
तिथेच मिटतील लाखो शंका
नदीकिनारी तरती नौका
वाट पाहतो पैलतटावर
तिथे भेटण्या येशील का?
- काव्यप्रथम
-
येथल्या वस्तीत माझे इमान होते
मी गेलो तरी पुढे विद्यमान होते
कोणीतीही सांगू नका प्रतिमा खरी
आरश्याला येथल्या ही भान होते
मी जरी गेला गुन्हा होता इथे
द्यायला शिक्षा तिथे वयमान होते
कुंपणाशी कोरल्या काट्या जरी
उमलणाऱ्याही फुलांना प्राण होते
का कधी आली न ती भेटावया
का तिचे वय एवढे लहान होते ?
मी इथे राहून गेलो केव्हातरी
जेव्हा मनाशी सोहळे गतिमान होते
- काव्यप्रथम-
तुझी आठवण आली नंतर..माहित नाही
काय जाहले जंतर मंतर...माहित नाही
वीजा चमकल्या,पाऊस पडला,कागदही ओला झाला
पुन्हा कसे आणू प्रत्यंतर..माहित नाही
पैसा-पाणी, पक्ष,पुढारी सगळे होते हाताशी मग
कुणी घडवले हे सत्तांतर..माहित नाही
मस्जिद,मंदिर,दर्गा फिरला एका देवासाठी
फक्त कसे सुटले अभ्यंतर..माहित नाही
सगळे काही "ओके" होते तिच्याबाजूने बहुदा
फक्त कसे देवू मी उत्तर..माहित नाही
बरे बाबा,मान्य..तुझ्यापुढे मी काहिच नाही
याहुनही कुठले गत्यतंर..माहित नाही
काल पुन्हा ही काळ इशारा देवून गेला
इतक्यात कसे वय झाले सत्तर..माहित नाही
- काव्यप्रथम
-
दार मनाची सताड उघडी
अशीच येवून जावू नको
भरुन अंती कागद कोरा
नुसती उमटून राहू नको
झऱ्यात वाहून तळ्यात पोहून
उगाच ओली होवू नको
कुणी रडले तुझ्यामुळे जर
उगाच भाव खाऊ नको
दरी डोंगरी उनाड होवून
माळावरती हिंडू नको
खोली कळली म्हणून
आता खोलामध्ये पळू नको
दिवसा येवून रात्री थांबून
चंद्र चांदणी लेवू नको
आशय सोडून सौदर्यांला
उगा भाकरी टाकू नको
कवी म्हणाला म्हणून आता
नुसती कविता राहू नको
मशाल हो बाई विशाल हो
अन् ऐन दुपारी झोपू नको
- काव्यप्रथम
-
मी झाडाखाली बसलो
झाडाची पाने ओली
केव्हाचा पाऊस रडतो
कवितांच्या भिजल्या ओळी
मग दूर पांगल्या ओळी
अर्थांच्या सुटती माना
मातीत कुणाचे मिळते
मी अपुले म्हणतो त्यांना
काव्यप्रथम
-
जागल्या आहेत ओळी तोवरी लिहून घे
गीत कंठातील आहे तोवरी गाऊन घे
ही मशागत आज आहे,आज कंटाळू नको
वेळ आहे तोवरी माती जरा कसून घे
थांबणारा आजही थांबेल रे ,नाही असे
वाट आहे ,ध्येय आहे ,तोवरी चालून घे
नाही रे उसंत आता पावलांना सांग तू
वादळे उठतील तेव्हा वादळे पचवून घे
त्या फुलांशी सख्य तरीही एवढा पिगळू नको
वेळ येता वार होतो हे जरा समजून घे
जात जा जेथे जिथे साधेपणाला वाव आहे
वाऊगे सांडून पाठी थोडके टिपून घे
फार नाही..रोज थोडा थोडका अभ्यास कर
जेव्हा कधी होशील मोठा,दाखले पाठून घे
- काव्यप्रथम
-
ये अशी चालून ये लिपटून जा
ये अशी या कागदावर माळतो बहरुन जा
माहिती केले गुन्हे मी खूप होते
आज शिक्षा काय ती देवून जा
आज ही शेजार आहे आठवांचा
सैल हया गाठी पुन्हा बांधून जा
पोहचले सारेच होते काढत्या पायानिशी
आज जाताना पुन्हा खिडकी खुली सोडून जा
डाव सारे टाकले होतेच मी पण
मीपणा चा डाव तू टाकून जा
येत जा वरचेवरी का होईना
दाखले डोळ्यातले माझ्यातुझ्या मिटवून जा
हाय ! मी बोलून गेलो बोलताना
झिंगला प्याला तिथे समजून जा
-