Prashant More   (प्रशांत रमेश)
22 Followers · 66 Following

read more
Joined 9 November 2019


read more
Joined 9 November 2019
11 NOV 2022 AT 19:54

जगण्यासाठी केली आहे धडपड इतकी..!!
सुख दुःखाची, आयुष्याशी सांगड इतकी..!!

का ते सुख इतके वलयांकित बनले आहे..?
का दुःखाला पचवायाला धडधड इतकी..?

इभ्रत गेली, गेला पैसा, सुख शांतीही,
आहे तुजला झिंगायाची का नड इतकी..?

नाही खाल्ली दमडी साधी बेईमानी,
हे आहे का कारण, माझी परवड इतकी..?

ना श्रावण तो, ना आपुलकी नात्यामध्ये..
कोणाची हिम्मत उचलाया कावड इतकी..?

तू गेली अन नशिबानेही थट्टा केली..
रोखू ना शकलो मी माझी पडझड इतकी..!!

-


8 NOV 2022 AT 12:19

जखमा... जरी फुलपाखरे..!!
कुरवाळणे आता पुरे..!!

जखमा... अश्या तू कोरल्या,
की काळजावर अक्षरे..!!

जखमा... तयांनी ही दिल्या,
मी मानतो जे सोयरे..!!

जखमा... कधी ही उघडते,
त्या आठवांची दफ्तरे..!!

जखमा... प्रशांता अन तुझा,
रिश्ता जसा की मैतरे..!!

-


2 OCT 2022 AT 20:05

शे पैसे कमवले आज मी शहरात आल्यावर..!!
आता फक्त मिळतो गाव तो स्मरणात आल्यावर..!!

तू सांगू नको फुलणे मला जे काय असते ते,
दरवेळी मला ही छाटले बहरात आल्यावर..!!

ती एका सुखासाठी तुझी हर पायरी चढते,
भेटू दे तिला ते सौख्य जे उदरात आल्यावर..!!

माझें प्रश्न ही सुटतात, अन ते धैर्य ही मिळते,
आईच्या कुशीमध्ये.. तुझ्या पदरात आल्यावर..!!

हो मी पाहतो दररोज माझ्या उंच गच्चीतुन,
तो परिवार जागे रातभर बरसात आल्यावर..!!

-


1 OCT 2022 AT 14:36

असा का मी खुळा झालो कळत नाही..!!
जगी का वेंधळा झालो कळत नाही..!!

तुझे अनुसरण भिमराया करविता मी,
कधी केव्हा निळा झालो कळत नाही..!!

तुला न्यावे वडाखाली फिरायाला,
सहज मी ही झुला झालो कळत नाही..!!

असे वाटे तिला माझे प्रेमच नाही,
तरीही रंगिला झालो कळत नाही..!!

तुला सोडून गेलो मी.. नि उमजावे,
जगाच्या वेगळा झालो कळत नाही..!!

-


30 SEP 2022 AT 13:30

पाठीत वार आधी, अन निर्विकार आता..!!
शिकलाय माणसाने, हा खेळ फार आता..!!

मी गाव सोडला रे, पैसे कमावयाला,
शहरात राहिले ना, पण रोजगार आता..!!

विसरून जात आहे, माझा तुझा सलोखा,
डोक्यात येत नाही, साधा विचार आता..!!

हो आजची असावी, सामर्थ्यवान स्त्री ती,
उपकार बा भिमाचे, नाही स्विकार आता..!!

आयुष्यभर जगाचे, ना ऐकले कधीही,
खंबीर आज ही मी, ठणकावणार आता..!!

तो बाप पाहिला अन, नकळत गहिवरलो मी,
हातात लेक केंव्हा, बागडवणार आता..!!

-


17 SEP 2022 AT 17:14

लाजाळूचे, अलगद मिटणे..!!
तुज स्पर्शाने, मन मोहरणे..!!

आयुष्याला जगणे, मरणे,
का ती नुसती चिंता करणे..!!

लाचारी ना केली केंव्हा..
जगण्यासाठी का ते झुकणे..?

एकल क्षण ही सरकत नाही,
सखये अवघड होते रुसणे..!!

जखमा आठवणींची मैफल,
अन मी ही कुरवळतो दुखणे..!!

तू माहेरी, श्रावण आला..
मज्जा नाही तुजविण भिजणे..!!

-


1 SEP 2022 AT 19:28

छातीस नांगरूनी, लेकास बाळगावे..!
अंती मला तरी का, झालेत हेलकावे..!

भारून टाकले तू, साऱ्याच मैफलीला,
येता क्षणीच तू ही, मधुगंध दरवळावे..!!

तू या ऋतू प्रमाणे, घे बोध आयुष्याला,
शिशिरात जर पडला, वर्षा ऋतू उठावे..!!

सोडून काम क्रोधा, अन लोभ मत्सरे ही, 
पंचशिल समज अन तू, बुद्धास शरण जावे..!!

आवेग तो चढावा, तुजला मिठीत घेता,
ओठात ओठ येता, रक्तात तू भिणावे..!!

-


20 AUG 2022 AT 21:39

वेदना बहरते, बांधतो गझल मी!!
दुःख जे सलवते, बांधतो गझल मी!!

आठवांच्या सहज, मैफली रंगता,
भावना तरळते, बांधतो गझल मी!!

तू असावी इथे, न्याहळावे तुला,
कल्पना रंगते, बांधतो गझल मी!!

वेदना ही हवी, तू दिलेली मला,
सहज ती हसवते, बांधतो गझल मी!!

जिंदगी तू मला, रडवते, फसवते..
आयुष्य सजवते, बांधतो गझल मी!!

-


10 AUG 2022 AT 6:49

चांद राती सखे, जागतो एकटा..
आठवांच्या कथा, वाचतो एकटा..
पायवाटा जरी, सोबती चाललो,
परत येता घरी, झोपतो एकटा..
मी जरी मैफली, भासतो हासरा,
वेदनेच्या कळा, सोसतो एकटा..
दोष माझा जसा, दोष होता तुझा,
वागण्याची सजा, भोगतो एकटा..
आठवावे तुला, दाटतो हा गळा,
हुंदका मग असा, दाबतो एकटा..
भावना बोलते, गझल सुचते मनी,
सहज मी डोलतो, नाचतो एकटा..
नाद वेडा किती, रे प्रशांता तुला
दुःख हृदयातले, टाचतो एकटा..

-


6 AUG 2022 AT 7:58

नको सापडू हा जुना डाव आहे..
तुला रंक केले, नि तो राव आहे..

कितीही असावा, जुना कार्यकर्ता,
स्वतःच्या पिलांना, चढा भाव आहे..

करावे कुणी ते, नि शिक्षा कुणाला?
तडीपार यादी, तुझे नाव आहे..

जरी लोकशाही, सरे अमृतवर्षी,
अजूनी तरीही, भुका गाव आहे..

असावी गुन्ह्यांची, तयांना पुण्याई,
किती काय झाले, तरी साव आहे..

ठगी कोण केली, पुसावे कुणाला?
प्रशांता जगाला, पुरे ठाव आहे..

-


Fetching Prashant More Quotes