ओल्या कडा पापण्यांच्या,
झळा खोल ह्या अंतरीच्या,
हुंदक्यातं जीव अडकता,
बंद झाल्या दिशा जाणिवांच्या....
प्रसाद शेंडगे..✍️-
व्हावं कधी अलिप्त,
दुनियेच्या त्या गोंधळातून...
तेव्हा सारं काही शांत वाटेल,
जरी डोळ्या समोर अंत असेल....
आता मोकळा श्वास घे,
दीर्घ उसासा घे,
स्वतःला दिलासा दे,
आणि भीड परत त्या गोंधळाला,
आता त्या गोंधळात सुद्धा तुला,
शांत वाटेल..सारं काही निवांत वाटेल....!
©प्रसाद शेंडगे..✍️-
ओझं आहे , जड आहे,
वाटतं कधी कधी...
माहीत नाही कसं होईल,
कमी होईल कधीतरी...
अवघड आहे, जमणार नाही,
वाटतं कधी कधी,
माहीत नाही जमणार कधी,
पण जमेल कधीतरी...
प्रसाद शेंडगे..✍️-
काय मिळवलं,
काय गमावलं..
ह्याचा लेखा-जोखा करत बसलो आहे...
आठवतोय मी तो दिवस,
जेव्हा मनापासून मी हसलो आहे...
डोळ्यांमध्ये उद्याचं स्वप्न,
आणि खांद्यावरती,
अपेक्षांचं ओझं आहे.....
निसटून जातय सारं हातुन,
जे समजत होतो माझं आहे....
काय मिळवलं,
काय गमावलं,
ह्याचा लेखा-जोखा करत बसलो आहे...
प्रसाद शेंडगे..✍️
-
गुरफटून गेली सारी हि नाजूक नाती,
ओघळणारे अश्रू हे माणिक मोती...
घाव कोरले किती असे ह्या देहावरती,
देहातं पेरतो श्वास मी पुन्हा उमलण्यासाठी...
प्रसाद शेंडगे..✍️-
सारं काही मनात लपवून,
जगासमोर हसता येतं...
पण असावं असं कुणीतरी आयुष्यात,
ज्याच्यासमोर तुम्हाला रुसता येतं...!!
प्रसाद शेंडगे..✍️-
वैसे तो मैं हसता कम हू,
पर हसाता ज्यादा हू...
वैसे केहने के लिये तो मे पुरा हू,
पर झांक के देखोगे तो,
अधुरा हू....
प्रसाद शेंडगे..✍️
-
थोडक्यातं मग राहुनी जाते,
थोडकेचं मग हाती उरते...
ह्या थोडक्या थोडक्यासाठी,
मनं कापुरासारखे झुरते...
प्रसाद शेंडगे..✍️-
जरी लागली उरी ठेचं,
तरी क्षण सुखाचा तू वेचं...
जरी गुंतलो अडचणीतं,
तरी सोडवू पुन्हा पेचं..!!
प्रसाद शेंडगे..✍️-
थकून गेला जीव तरी,
ओढ ऊरी "ती"च आहे...
इथे हरलो तरी फिकीर नाही,
शेवटी....जिंकणार तर "मी"च आहे..
प्रसाद शेंडगे..✍️-