Prasad Joshi   (©Prasad Ramakant Joshi)
53 Followers · 14 Following

I'm an professional writer in entertainment industry.
Joined 30 June 2018


I'm an professional writer in entertainment industry.
Joined 30 June 2018
29 OCT 2021 AT 10:45

ते:- काय हो हल्ली बरेच लोक सतत आपलं
"इंशाअल्लाह" "इंशाअल्लाह" असं म्हणत असतात...

पुन्हा तेच :- बरं कां !!!
मला "इंशाअल्लाह" नावाचं नाटक ठाऊक आहे..

हे :- जाऊ द्या हो ! कशाला डोक्याला ताप करुन घेताय???
अनेकांना आपण काय बोलतोय याचा अर्थही ठाऊक नसतो
तरीही बोलतात नां?

पुन्हा हेच:- उदाहरणार्थ काही लोकांना कसं सतत "आयला" किंवा "च्यायला" म्हणायची सवय असते की नाही ?
तसंच आहे हे !

मग निव्वळ एक दोन सुस्कारे

दोघे (एकत्र):- म्हणजे आहे हे असं आहे म्हणायचं तर

-


14 SEP 2021 AT 16:01

When we were kids
our parents used to be
a strongest wall behind us,
At that time
actually they were
The Trouble Shooters


Now we're kinda grown-up guys
Our parents are
wanting or waiting for us to
turn into
The Trouble Shooters...

-


19 AUG 2021 AT 15:22


दोस्त हो
एकदा आरश्यात नीटपणे बघा!
तुम्ही अनेकांचे मित्र असाल
पण
तुम्हाला किती मित्र आहेत
याची चाचपणी केली आहे कधी?

सख्खं म्हणावं असं कुणीच नसलं यादीत
तर लोक तुमचा निव्वळ वापर करताहेत
हे स्वतःला सांगा अन् मोकळे व्हा !
#आपलं_कुणीतरी_असावं

-


28 JUL 2021 AT 13:03

आपण निसर्गाशी अनेकदा खेळतो, सतत खेळतो,
मग निसर्ग आपल्याला एकदाच खेळ दाखवतो.

मात्र निसर्ग आपल्याला माती, चिखलाची अन् मृतदेहांची झालेली कवडीमोल किंमतही दाखवतो..

आज कुणालातरी एका ढिगाऱ्याखाली
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाची पत्रकं सापडली म्हणे...

-


22 JUN 2021 AT 13:53

तिची आठवण काढायची नाही
हे पक्कं ठरवलेलं

जमेल तसं वागतो मी, ठरवल्याप्रमाणे !

पण आत्ता डोळ्यासमोर बोगनवेल...

-


16 JUN 2021 AT 12:01

ज्याचं त्याचं प्रतिबिंब, हवं तसं आणावं

मी फक्त लख्ख आरसे विकेन म्हणतो

-


13 JUN 2021 AT 22:19

हसर्‍या संध्याकाळी
एखाद्या बोचर्‍या क्षणी
तू येतेस

नाहीच आलीस तर
आठवणींचे काजवे पाठवतेस...

मग दिवस सरताना संध्याकाळ ओलांडून थेट रात्रच उजाडते...

तेव्हा कळतं की काजवे बेईमान असतात !!!

-


30 MAY 2021 AT 9:15

ओल आलेल्या भिंतीला टेकू नये
शेवाळाला ओळख असू शकते

-


29 MAY 2021 AT 16:31

एखादं मूल असतं
ओके?
सर्वप्रथम ते जन्मतः मूलच असतं
मग काही सेकंदात ते कोणत्या लिंगाचं आहे हे समजतं
मग कागद समोर येतात अन् त्या जीवाची जात ठरते आणि भविष्य देखील
साला प्रत्येकानं अनाथ असायला हवं
आणि
कुणीच कुणाला दत्तक घ्यायला नको...

-


21 AUG 2020 AT 16:17

आमच्या येथे संवेदनांचे
प्रिंट आऊट मिळतील
सोबतच
संवादांचेही क्यू आर कोड
स्कॅन करुन दिले जातील.

स्पेशल ऑफर:-
दोन संवादांवर
एका संवेदनेचा
प्रिंट आऊट मोफत मिळेल

-


Fetching Prasad Joshi Quotes