Pranjali   (अनामिका...)
27 Followers · 10 Following

मराठी मुलगी 🚩
Joined 14 July 2020


मराठी मुलगी 🚩
Joined 14 July 2020
6 NOV 2021 AT 16:34

नेहमी तिला भेटण्यासाठी उत्सुक असणारा तो,
आज मि तुला भेटू शकत नाही कारण,
माझ्या आईला माझी गरज आहे, ती आजारी आहे
असं सांगत होता...
नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याच्यावर रागावणारी ती, काही हरकत नाही, तुझ्यावर जबाबदारी आहे समजू शकते, असं बोलत होती...

घराची स्वच्छता तुझी जबाबदारी असं निक्षून सांगणारा तो, आज स्वतः बेडवरील ओला टॉवेल उचलून सुकायला ठेवत होता कारण, तीला बरं वाटत नव्हतं...
त्याच्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे माहीत असणारी ती आज आरामात झोपलेली होती कारण आज तो रागावणार नाही यावर तीचा विश्वास होता...

महिन्यातून एकदा तरी शॉपिंग करायचीच असा हट्ट करणारी ती, आज कपाटातील जुन्या कपड्यांना इस्री करत होती कारण,नुकतीच त्याने नोकरी गमावली होती..
तीला शॉपिंग किती प्रिय आहे हे माहीत असणारा तो
आज तिच्यासाठी साध गुलाबाच फुल घेवून तयार होता
कारण, त्याचा तीच्या समजुतदारीवर विश्वास होता...

-


30 OCT 2021 AT 1:45

आपण कुणाशी प्रामाणिक नसलो तरी चालेल पण स्वतःच्या मनाशी नेहमी प्रामाणिक असावं कारण जग तेच बघतं जे आपण दाखवतो, मग ते किती खरं किंवा किती खोट याचा विचार कुणीही करत नाही एवढा वेळ कुणीचं कुणाला देत नाही,पण दिवसभरात एक क्षण नक्कीच येतो जेव्हा आपल्याला आपल्या मनाला उत्तरं द्यायची असतात आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा आपण कुठलचं खोट बोलू शकत नाही तिथे कुठलाचं दिखावा चालत नाही जे असतं तेचं बोलाव लागतं आणि, मग सगळी पंचायत होते,त्यामुळे आपलं वागणं असच असावं कि दिवसाच्या त्या क्षणात मनाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आपण देवू शकतो...

-


20 OCT 2021 AT 11:09

कधी कधी काय होत, कळतच नाही कस वागाव कि
आपल्या कोणत्या वागण्याने समोरच्याला वाईट वाटणार आहे किंवा कुठलं बोलण समोरच्याला आवडणार नाही हे ही समजत नाही,,नकळत आपण काहीतरी बोलून जातो आणि नेमकं तेच समोरचा पकडतो..आता हे असं फक्त एखाद नात असल त्या ठिकाणीच होत असं नाही कधितरी आपल्यात कुठल नातही नसतं, पण एक माणूस म्हणून माणूसकी जपायची म्हणून आपण नेहमी प्रत्येकाच मन जपण्याचा प्रयत्न करतो....अर्थात अस करत असताना खुपदा स्वतःच्या मनालाच नाराज करतो, दुखावतो...मग अश्यावेळी आपल मन जपायला किंवा आपल्या मनाचा विचार करायला समोरचा व्यक्ती कधीच पुढे येत नाही,,तेव्हा आपण एकटेच असतो...अर्थात त्यात आपलीच चूक असते, आपण विचार करतो आणि समोरची व्यक्ती करत नसते किंवा तेवढी किंमतही देत नसेल..अस म्हणतात कोणासाठी स्वभाव बदलू नये पण कधितरी असचं वाटतं तोच स्वभाव आपलाच घात करत असेल तर वेळीच बदलावा...मग प्रश्न पडतो, खुप चांगल असणं खरचं चांगल नसतं का??

-


15 OCT 2021 AT 19:19

आजचा दिवस एक गोष्ट शिकवून गेला,
एरवी कुणीही न विचारणाऱ्या आपाट्याच्या पानाला आज सोन म्हणून मिरवण्यात आलं....
मग आपण तर चालते बोलते माणसं आहोत,आज जरी आपली किंमत शुन्य असली तरी एक दिवस आपणही सोन म्हणून मिरवू शकतो...

-


5 AUG 2021 AT 12:03

आँखों के आँसू छिपाकर
होंठोंपे मुस्कुराहट लाना
कितना मुश्किल होता है...

-


28 JUL 2021 AT 8:45

अजूनही काही लोक जर मुलांपेक्षा मुलींना कमजोर समजत असतील,
तर अश्या लोकांनी टोकियो आँलम्पिक एकदा आवर्जून बघाच...

-


27 JUL 2021 AT 18:18

चेहरे पे मत जाइए जनाब,
दिल बडा good looking है हमारा...

-


25 JUL 2021 AT 19:06

खामोशीयाँ भी बहोत बाते करती हैं
सिर्फ सुनने के लिए कान नही दिल का होना जरूरी है...

-


25 JUL 2021 AT 18:56

प्रेमात पडण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो
प्रेम विसरण्यासाठी मात्र आख्ख आयुष्य पणाला लागतं....

-


19 JUL 2021 AT 17:24

अजब हैं यार,
समझने वाले कम है,और समझाने वालों ने ही भीड़ कर रखी है...

-


Fetching Pranjali Quotes