Pranil Save   (© प्रणिल सावे...🌱)
212 Followers · 286 Following

Joined 24 August 2018


Joined 24 August 2018
31 MAR 2019 AT 16:19

या हो दादा, या हो माई,
बसा सावलीमध्ये क्षणभर,
जरा चाखून तरी बघा,
माझ्या कष्टाची भाकर..

काळी माय, आम्ही तिची लेकरं...
शेतामंदीच पिकवतोया हे सारं...

नाही चीज, नाही घातले पनीर...
भाकरीला नाही वरून बटर...

टिचभर ठेचा अन् पोटभर भाकरं...
कितीबी खा, नाही वाढणार तुमची शुगर...

गाळतूया घाम, फुलवतोया शिवार...
निसर्गराजाच घालतोया मायेची पाखर...

सर्जा राजा शेतात ओढतो नांगर...
आवडी दळतीया पीठ, घालूनी जवार...

एवढ्याश्या गरजेचा आमचा सुखी हा संसार..
जरा चाखून तरी बघा, माझ्या कष्टाची भाकर..
जरा चाखून तरी बघा, माझ्या कष्टाची भाकर...

-


27 NOV 2020 AT 7:11

महामौन साध्य,
महामौन साधन,
महामौन आचरण,
महामौन ध्यान,
महामौन संगीत,
मौनातच गुणगुणावे,
दास म्हणे जे जे आपुले,
ते ते प्रभुसी अर्पावे...

-


15 NOV 2020 AT 8:54

केवळ नामाने माणिकाचे व्हा,
कायिक, वाचिक अन् मानसिक,
एक माणिकाचे ध्यानच होईल,
सर्व सुखासी कारणिक...

जय गुरू माणिक,
जय जय गुरू माणिक...

-


15 NOV 2020 AT 7:28

केवळ नामाने त्याचे व्हा,
कायिक, वाचिक अन् मानसिक,
एक त्याचे ध्यानच होईल,
सर्व सुखासी कारणिक...

जय शंकर, जय जय शंकर...
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ...
जय गिरनारी, जय जय गिरनारी...

-


14 NOV 2020 AT 17:24

सण दिवाळी दिव्यांचा ।
सुंदर सडा रांगोळ्यांचा ।
गोडवा घोळूनी नामाचा ।
साजरा करावा ॥१॥

ज्ञान आनंदाची दिवाळी ।
फराळा बोलवा माणिकमाऊली ।
श्रीप्रभुनाम फराळाची थाळी ।
अर्पावी मनोभावे ॥२॥

षड्रिपुंचा तो नरकासूर ।
नामे करावा चकनाचूर ।
नामाचेच फटाके सर्वदूर ।
जनी वाजवावे ॥३॥

नामाचा आकाश दिवा ।
हृदयात नित्य पेटवावा ।
ज्ञानाचा प्रकाश अनुभवावा ।
स्वये अंतरात ॥४॥

देहाचा करूनी दीप ।
नामाचे घालूनी तूप ।
उजळवा श्रीप्रभु समीप ।
दत्तदास म्हणे॥५॥

दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...

-


14 NOV 2020 AT 17:17

सण दिवाळी दिव्यांचा ।
सुंदर सडा रांगोळ्यांचा ।
गोडवा घोळूनी नामाचा ।
साजरा करावा ॥१॥

खुळ्या आनंदाची दिवाळी ।
फराळा बोलवा स्वामीमाऊली ।
स्वामीनाम फराळाची थाळी ।
अर्पावी मनोभावे ॥२॥

षड्रिपुंचा तो नरकासूर ।
नामे करावा चकनाचूर ।
नामाचेच फटाके सर्वदूर ।
जनी वाजवावे ॥३॥

नामाचा आकाश दिवा ।
हृदयात नित्य पेटवावा ।
ज्ञानाचा प्रकाश अनुभवावा ।
स्वये अंतरात ॥४॥

देहाचा करूनी दीप ।
नामाचे घालूनी तूप ।
उजळवा स्वामी समीप ।
दत्तदास म्हणे॥५॥

दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...

-


14 NOV 2020 AT 7:31

🙏नाम सर्वोत्तम🙏

-


12 SEP 2020 AT 13:23

हर तारा रोशन करू
बनकर मैं प्रकाश,
सबको घेरे रहता
मैं ऐसा आकाश...

-


1 SEP 2020 AT 22:51

आळविता कंठ शब्द
भाव आनंद दत्त शब्द
तन मन सूर निर्मळ
गर्जती प्रेमभक्ती विमल
मंगल शुभ श्रद्धा कमल ॥१॥

सारेगम आलाप सप्तकातील
मना अंतःर्नाद
एकाग्र ध्यान शांत गान
गानप्रिय नाम जीवन
सुमनासम प्रीती भजन
प ध नी छेडिला नाद सूर
ब्रह्मभैरवी निनाद ॥२॥

रेचक पुरक श्वास सूर
नाद घुमविता अंतरसार
सदगुरू शिकवण विचार
शब्द शब्दांच्या पलीकडे
त्रिभुवनांत चाले संवाद ॥३॥

-


1 SEP 2020 AT 15:27

बोधपाठ
ॐ नमो गणेशा, सिद्ध शब्द मंत्र
लक्षण हा नाम, काम सदा ॥१॥
शारदे माते, कृपा करी वेदा
शब्द देई नाम, सदा सदा ॥२॥
नमन ग्रंथ मुनी, कवी प्रतिभा शब्द
करूनि अभ्यास, सांगे सदा ॥३॥
बोध गुरू स्वामी, भक्ती ज्ञान कामी
साधन करी नित्य, जपा नाम ॥४॥
संत सदा सांगे, नाम हरी जपावे
चिंतन राम नामे, त्वमेव भावे ॥५॥
सदगुरू म्हणे, जाणी ध्यानी
उद्धरे नामे, नाम मार्ग ॥६॥

-


Fetching Pranil Save Quotes