Pramod Ghorpade   (कांतासुत)
1.9k Followers · 3.3k Following

read more
Joined 27 November 2019


read more
Joined 27 November 2019
22 JUL 2022 AT 0:47

माणसाला कळत्या का , माणसाच्या खऱ्या जाती ,,
माझी आई त्याची अम्मा ,दोन्ही जळणाऱ्या वाती ..

-


6 JUL 2022 AT 21:13

अख्खा मला तरी तू
कळला अजून कोठे ?
इतक्या मना अपेक्षा
दुसऱ्या कडून कोठे ?
इतक्या दिवस तुला मी
कसरत करून जपले,
ऐ आसवा निघाला
डोळ्यांमधून कोठे ?

✍️ अनंत राऊत

-


26 JUN 2022 AT 19:50

पुढे जाऊन मागे येण्यात
कुणाला "रस" असतो ,,
पण एखादा प्रवास मात्र
गर्दीपर्यंत "बस" असतो ..

-


19 JUN 2022 AT 11:47

सांभाळ तू स्वतःला लागेल ओढताना
झाडे मला म्हणाली लाकूड तोडताना.

झाडास लागली बघ चिंता तुझ्या उद्याची
घेणार श्वास कुठुनी मजले उभारताना.

- करण सोळसे

-


19 JUN 2022 AT 11:46

असा रोज जातो इथेही बळी ,
उमलताच कळते जगाला कळी .

-


10 MAY 2022 AT 19:04

ठिणगीत साठलेला , केव्हढा विनाश असतो ,,
इतुकिसी वात असते , कितका प्रकाश होतो ..

-


6 MAY 2022 AT 19:40

पिल्लांनाही कळले नाही , आई गेली आली नाही ,,
छोटी पिल्ले रडू लागली
मोठे म्हटले , आई गेली आहे मेली नाही ..

-


26 APR 2022 AT 18:50

खऱ्या मुलीच्या हातात मी हात दिला होता ,
नेमकी बघा तिनेच कसा घात केला होता ,
मी केलेली चूक माझ्या मित्राने करू नये ,
प्रेम शब्दाच्या नावाखाली चुकीचा हात धरू नये ,,
दुसऱ्यांना सांगितले तर त्यांनी चेहरे बदलवले ,
एका मुलीने माझे सारे मित्र बिघडवले ..

-


25 APR 2022 AT 16:59

तिने थांबवले नसते तर
किती छान झाले असते ,
माझ्या बहिणीचे सुध्दा
तिच्या लग्नात मानपान झाले असते....

प्रमोद घोरपडे (कांतासुत)

-


8 MAR 2022 AT 23:09

झाडूसारखे निर्मळ करून निर्मळ आयुष्य मला मिळाले असते तर....
मी फिरलो असतो इस्त्री केलेल्या कपड्यांवरून,
गच्च भरलेल्या पैशांच्या बंडलवरून,

मी झाडली असती ती धूळ .... सरकारी टेबलाखालून,
कधी मंदिर , कधी लाचार लेखणी आणि कधी माझ्याचआतून..

मी पुसली असती ....दगडावरची भावना
आणि
पेठेतली वासना सुध्दा..

✍️ कांतासुत


-


Fetching Pramod Ghorpade Quotes