भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.
तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे-
दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न
होण्याईतकी बुद्धी,स्वाभिमान ज्याला आहे
तोच माणूस स्वतंत्र आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर-
मी जेवढी गरिबी अनुभवली आहे तेवढी गरिबी या देशातील एकाही नेत्याने अनुभवली नसेल मी गरीब असून देखील गरिबीचे कारण सांगून मी माझा स्वाभिमान व माझ्या आंदोलन कमी होऊ दिले नाही एवढी गरिबी असूनही मी कधीही पैशासाठी,पदासाठी विकलो गेलो नाही आणि तेच ध्येय ठेऊन आपल्या रक्ताच्या माणसांसाठी काम केले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर-
जर्रे जर्रे पर खुदा की निगाहे करम हैं
ना तुम पर जादा ना हम पर कम हैं-
शतरंज मे वझीर और जिंदगी मे जमीर मर जाये तो समझ लेना आपका खेल खतम
-
युवा नेता होण्यासाठी लागणारं साहित्य अन पात्रता -
1- डुप्लिकेट कोल्हापुरी चप्पल
2- दोनशे रु.चा व्हाईट लिनन शर्ट अन पँट
(शर्टच्या खिशात बाहेरून दिसेल अशी शंभरची एक नोट असावी व आतून दहा-दहा च्या नोटा असाव्यात, पॅन्ट शक्यतो जास्त पातळ नसावी आतली लाल अंडरवियर दिसू शकते)
3- खिशात अन तोंडात मावा
4- एखादा ब्रँडेड दिसणारा पण नसणारा पेन
5- दोन फेसबुक खाते अन जरासा मोठा मोबाईल (शक्यतो हातात ठेवावा)
6- नेत्यांसोबत चार-दोन फोटो, सेल्फी असल्यास उत्तम
7- कोपच्यात आलेल्या चार-दोन बातम्या आणि एखादं बॅनर (नंतर ते सोयाबीनचं बुचाड किंवा कडब्याची गंज झाकायला कामी येतंच म्हणा)
8- पेट्रोल तळाला गेलेली एखादी बाईक (त्यावर साहेबांचा फोटो)
9- उधारी असलेलं चहाचं हॉटेल, पान टपरी ( उधारी वाढल्यास वेळीच टपरी बदलायला हवी अन्यथा अब्रूचं खोब्र व्हायला वेळ लागत नाही )
10- सत्तर रुपयाचा लिंबा खालचा गॉगल ( कलर शक्यतो काळा असावा )
पात्रता एकच आहे: तो प्रचंड बेरोजगार असावा अन घरात इज्जत नसावी
झाला लगी;
आमचं काळीज,
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, मार्गदर्शक,
भावी सरपंच,
साहेबांचा विश्वासू,
साहेबांचा डावा (उजवा) हात,
उमलतं नेतृत्व,
आधारस्तंभ ....!!
वगैरे वगैरे . *युवा मित्रांसाठी*-
कोट्यवधी डोक्यातून ' राजगृह ' पकावट आहे.
खिडकीला झटनाऱ्यांची औकात कळते आम्हाला
अरे श्रीमंती युगायुगाची बाप देऊन गेला
दिडकीला झुलणाऱ्याची औकात कळते आम्हाला कवी : केशव खटिंग-
हिरवा,तांबडा,भगवा, निळा खांद्यावर चार चार झेंडे,
बाबासाहेबांचा भाकरीला बेईमान झालेत गेंडे-
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कामानिमित्त बाहेर गेलेले किती लोक पर जिल्ह्यात आहेत याची माहिती घेऊन त्यांना आणण्याची व्यवस्था करावी कारण पुण्यातील आणि मुंबई मधील कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या बघून ते भीतीने तसेच हाताला कोणतेही काम नसल्याकारणाने किंवा मदत न मिळाल्याने ते कोणत्याही मार्गाने आपल्या जिल्ह्यात प्रवेश करतील आणि त्यातील एखादा व्यक्ती संक्रमित असल्यास त्या जिल्ह्यात इतर लोक बाधित होऊन हा आकडा वाढतच जाईल.पुढील संभाव्य धोका टाळायचा असल्यास हे करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन हे वाढतच चालले आहे त्या मुळे लोकांचा संयम देखील सुटत चालला आहे.त्या कामगारांना आणल्यास त्यांना थेट जिल्ह्यात प्रवेश न देता 14 दिवस शासनाने त्यांचे विलिगीकरण करून झाल्यानंतरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवस बाहेर जिल्ह्यातील कामगाराची नोंदणी करून घ्यावी नंतर ज्या त्या जिल्ह्यात बस मार्फत कामगारांना सोडावे अन्य था ज्या जिल्ह्यात गैरमार्गाने रुग्ण मोठ्या प्रमाणात आले तर याचा परिणाम गंभीर होत जाईल याची शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि उचित उपाययोजना करून प्रश्न सोडावा.
-
भूक लागली म्हणून, भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही. आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे, पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिचं आपली श्रीमंती असते.-