आठवणीतील क्षणाक्षणांची,
एक आस वाटते मला,
भुतकाळाच्या काळोखातली,
ही रात्र बोचते मला।
असंख्य अशा स्वप्नांचा,
साठवलेला एक ठेवा,
आपुल्यांच्या आघातातुनी,
मनं सावरेल हे केव्हा?
आसवांच्या प्रवाहाचाही,
वाहुनी जणू संपला झरा,
वाटेकडील त्या पापणीचा,
त्राण संपलाची खरा।
सुखांच्या त्या सरींचा,
कधी आभास वाटतो जुना,
घडाळाच्या त्या काट्यातुनी,
सत्य आयुष्याचे दिसते पुन्हा।
मनं-बुद्धीच्या डावामधले,
घाव सोसतील पुन्हा ?
एकाकी ह्या आयुष्यातली,
ही रात्र बोचते मला।
- प्रकाश सारोळकर-
पराभव...
भावनांचा हा खेळ,
ना जमला कधी मला,
मनाचे या बोलणे,
कधी या मुखाने,
व्यक्त करता आले ना मला,
निरागस हे नाते,
जपावे छान पदोपदी,
दुनियादारीची ही धुळ,
ना कधी बसु दिली याला,
स्वच्छ या मनाचे भाव,
ना कधी रुजले तुला,
मनाचे हे नाते,
देवासम पुजले रे मना,
दुनियेच्या ह्या विळख्यात ,
आपुलेसे असे एक होते,
जगण्याच्या या आशेत,
तुझे नि माझे घर होते,
सुंदर या घराला,
नजर लागली ती कोणाची?
मनाचे न संपणारे नाते हे,
संपवूनी तु गेलीसच कशी?
आज ह्या मनाची हार झाली !!!-
।। श्री ।।
कुछ़ लफ़्ज ना समझ पाए
कुछ़ यादों को भी तुम चुनो,
कतरा कतरा इन ख़्वाबों का,
कुछ़ मैं कहूँ कुछ़ तुम सुनो!-
।। श्री ।।
स्वप्न असे की सत्य ते,
रंग स्वप्नांचे की इंद्रधनु,
प्राण एक की श्वास ते,
चांदरातीचे स्वप्न जणू,
शोधतो मी !!-
।। श्री ।।
कुछ खास है पल साथ तेरे,
जिंदगी बितती भी हँसती है,
मिलो दूर सी मंजील अपनी,
बस्स चार कदम सी लगती है।-
।। श्री ।।
हवाँओ से बाते कर मैंने रुह तक देखी है,
बदलते इस मौसम में जिंदगी बदलती देखी है,
गौर कर दिल के अरमानों का मुसाफिर,
मैंने नजरोंसे जिंदगी गुजरती देखी है ।-
।। श्री ।।
माता विश्वाची तू । प्रेमळ तू आई।
सुगंधीत जाई । जगदंबा।
मन तृप्त असे । शमविते भूक ।
सुगरण खूप । अन्नपूर्णा ।
ज्ञात सर्वकाही। मनातची सर्व।
नाही कैसा गर्व । सरस्वती।
संहार दुःखांचा । करे महाकाली।
अनाथांची वाली । भवानी तू।
स्वर्ग घरट्याचा । कुटूंब तारले।
दुःखही हरले । महालक्ष्मी ।-
ख्वाँबो को समीटना सिख लेना दोस्त,
कुछ ख्वाहिशे अक्सर अधूरी रहती है,
सपनो के महल तो कई टुटे बिखरे है,
शायद सपनो के टूटने की आवाज नहीं होती ।-