Pragati Salve  
67 Followers · 3 Following

Joined 28 August 2019


Joined 28 August 2019
28 NOV 2023 AT 19:54

नकली वस्तूला किंमत या जगात
असली ला मात्र भाव नाही,
देखाव्याचे मुखवटे नुसते
माणुसकीचे गाव नाही.

-


28 AUG 2023 AT 12:56

जिंदगी के सफर में आप हमें मिले,
चारों ओर हमारे खुशियों के फूल खिले l
जिस दिन का हम
साल भर कर रहे थे इंतजार,
वो आपका जनम दीन
है खुशी का त्योहार ll
आपकी मनोकामना सब पुरी हो जाए
यही हमारी रब से दुआ है
खुशी से सदा झोली भर जाए lll
Happy birthday dear Love.

-


27 JUL 2023 AT 11:56

कळतं नाही मला माझं काय चुकतयं
पण फुल गुलाबाचं लगेच सुकतयं
कितीही बोलले सरळ
तरी उलट अर्थ घेतला जातो
भोळ्या मनाने कळी कुरवाळली
तरी मलाच माझा पश्र्चाताप होतो

-


22 JUL 2023 AT 6:52

क्षण कोणताही असो, जगून घ्यायचं असतं
दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं
हसता नाही आलं तरी हसायचं असतं
कर्तव्याच्या नावाखाली स्वतः ला राबवायच असतं
पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं
आकाशात झेपावूनही धरतीला मात्र विसरायच नसतं
आयुष्य हे असंच जगायचं असतं.

-


16 JUL 2023 AT 22:43

ती किती भाग्यवान असते ना...
जन्म एका घरी घेते
पण तिचे आयुष्य मात्र
दुसऱ्या घरी जाते
ती वंशाची पणती असते
जी प्रकाश दोन्ही घरात आणते
एक मुलगी म्हणून जन्माला येते,
पुढे जाऊन ती मैत्रीण बनते
कोणाची तरी पत्नी बनते
एक जबाबदार सून बनते
सुख, दुःख, संकटे काहीही असो
धेर्याने सामोरे जाते
ती एक आई बनते
आणि सर्व आयुष्य आपल्या
मुलांवर ओवाळून टाकते
तिचा सगळेच करतात हेवा
खरचं...
बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा. 🙏🙏

-


12 JUL 2023 AT 22:36

स्वभावाने प्रेमळ आणि मनाने साधा
सगळ्यांचा लाडका आहेस तू दादा

रागावर तुझ्या सुटतो
कधी कधी ताबा
शांत झाल्यावर मग
पश्छाताप करतोस बाबा

हळवा होतोस कधी
तर कधी होतोस चिडका
तुझ्यावर ओरडून बोलताच
चेहरा करतोस रडका

तुझ्या जीवन प्रवासात
तू खूप खाल्ल्यास ठेचा
यशस्वी नक्कीच होशील
मग यशाचे फुले वेचा

तु स्थापित केलय आता स्वतःच राज
सुखाचा संसार कर पुढे तू स्वराज

आज आहे काही खास दिवस
माझ्या एकुलत्या एक अन्
लाडक्या भावाला Happy वाढदिवस..

-


12 JUL 2023 AT 22:13

स्वतंत्र भारत झाला
सारे लोकशाहीने जगती
स्वराज स्थापित करुनी
मोठ्या स्वाभिमानानं वागती

मंगल प्रसंग घडतो
जेव्हा करुणा जन्म घेते
प्रगतीची वाटचाल होताच
मग साक्षी धावत येते

तेजस रुपी साथ आहे
कार्य सफल होण्याला
संसाराची घडी बसुनी
देवदत्तची नाव पुढे जाण्याला

-


11 JUL 2023 AT 11:23

जिंदगी में तुम्हारे साथ चलना
सुख दुख मिलकर सहना
तुम्हे सदा हसते हुए देखना
हमें खुशी मिलती है
सच में....

-


8 JUL 2023 AT 16:22

हिरव्यागार मळ्यात उमलले फुल
कळी बघताच जणू पडली होती भुल....
दरवळला सुगंध फुलाचा चोहीकडे
असं गोजिरं बाळ साजे आम्हा गडे...I

देखण्या रूपाचं आहे ते गोरं गोरं पान
नजर पडताच हरतं साऱ्यांच देहभान
बोबडे बोबडे बोल शोभती त्या ओठी
त्याच ओढीने जवळ येती नात्यांच्या गाठी...II

कोणी म्हणे अगं माझं पिल्लू
तर कोणी शोना बाबू म्हणती,
पण लाडा- कौतुकाची अन्विका
जिला सारे टोपण नावाने परी म्हणती....III

तुरुतुरु चालणं आणि गुलुगुलू बोलणं
नटखट, शरारती तर कधी शहाणपणाने वागणं
तिचे गुण पाहुनी सारे होती फिदा
विसरता येत नाहीत आठवणीत राहतात अदा...lV

गाणे, गोष्टी, नाच साऱ्यातच असे हुशार
अभ्यास करता करता कधी मोबाईल घेऊन पशार
तिच्या गुणांची मी किती सांगू नवलाई
सगळे गुण शब्दात मांडणं सोपं नाही...V

शब्द कमी पडतील अशा तिच्यात आहे कला
कितीही लिहीत राहिलं तरी सुचत राहील मला...VI


- प्रगती तेजस मनोहर






-


6 JUL 2023 AT 14:36

जीवनात तुझ्या येऊनी
मी स्वतःला नव्याने पाहिले,
तुझ्या हाकेला साद देऊनी
सारे आयुष्य तुला वाहिले...

सगळ्यांची मने जपतोस तू
तुझ्या मनाला कोणी जपावे,
निःस्वार्थ पणे झिजतोस तू
स्वतःसाठीही थोडे झिजावे...

दिसायला देखणा रूप सुंदर
पण म्हणती आहे रागीट,
तुझ्या मनाचा कोमलपणा
ओळखला का कोणी नीट....

कधी हळवा कधी गोडवा
कधी attitude असतो तुझ्या स्वभावात,
क्षणोक्षणी साथ हवी तुझी
मी आहे तुझ्या प्रेमाच्या प्रभावात....

- प्रगती

-


Fetching Pragati Salve Quotes