मुखवटे माणसांचे,
आरसाही पाहुन गोंधळलेला...
उगाचच बदनाम सरडा ,
बदलणाऱ्या रंगाला ...
असे दुःख दुसऱ्याचे,
कुणासाठी मेजवानी हसण्याची...
सोसतोय तो हसतोय खुलास,
ना तमा त्याला कशाची नि कुणाची ...
माणुसकी माणसाची,
फार गेलीय गोठून ...
आपल्यानीच पाठ फिरवून,
आपुलकीही टाकलीय विरून...
नावापुरती राहिलीत ,
दाखवण्यासाठी नाती ...
सगे-सोयरे कुणी नाही ,
जिथे तिथे स्वार्थी वृत्ती...!-
कधी कधी खूप राग येतो आपलाच काहीच कारण नसताना... पण बोलायला गेलं वेगळं काहीतरी होईल की काय ह्याची मनोमन भीती जाणवू लागते ,कुठे तरी चुकलो की काय ह्याची सतत जाणीव होत राहते,घडतंय ते बरोबर आहे की नाही याचा सतत विचार त्याचबरोबर आपणच कुठेतरी जबाबदार आहोत याची खंत , होत अस कधी कधी अस बोलून आपणच आपली समजूत काढतो , वरवरच्या हसण्यावरील वागण्यावर आतील घुसमट खूप वेळा त्रास देऊन जाते , कुणीतरी हवंच असत प्रत्येकाला ऐकुन घेणारं, प्रत्येकाचं स्वतःशीच द्वंद्व युद्ध चालू असतंच , जगी सुखी असा कुणी नाही ,प्रत्येकाच्या हास्यामागे काही न काही लपलेलंच असतं काही माणसांना फक्त ते कळत नसत किंवा कळत असून सुद्धा त्यांना त्याची काहीच पडलेली नसते.
- काहीसं मनातलं-
गोडवा मनाचा,
हळव्या भावनांचा !
एकमेकांच्या मिठीत ,
गुरफटलेल्या श्वासांचा !!!-
उरी आशा बाळगुन आहे;
येशील परतून केव्हातरी ,
डोळे वाट पाहत आहेत...-
चिंधी बोलती सारे , नावडती तू सर्वांची
जन्मतः संघर्ष तुझ्या पदरी,खाल्लीस पोळी सारणावरची !
चार वर्ग शिकुनी , बालविवाह हा जाहला...
चारित्र्यवर शिंतोडे उडुनी ,संसार हा मोडला !
गोठयात जन्म ,मुलीस दिलास ...
राहिले ना तुजपाशी ,सासर -माहेर आश्रयास !
पोटासाठी रेल्वेमध्ये ,गाणे तू गासी...
निराधार मुलांची "आई" तू होसी !
घडवला तू इतिहास , सोसूनी अनेक कळा ...
अनाथ मुलांना ममता देऊनी , लाविलास तू लळा !
तुझ्या कार्यासाठी ,पुरस्कार अनेक लाभले ...
कर्तृत्व मोठे असूनही ,पदर डोईवरचा न हले !
गरिबांची कैवारी तू , अनाथांची वाली ...
कित्येक जीवांना , निराधार करुनि गेली!
आपल्यात असलेली "माय "फक्त जागृत राहावी
हीच असेल "माई "तुला खरी श्रद्धांजली !!!
हीच असेल "माई "तुला खरी श्रद्धांजली !!!
-
जिसके तलाश मैं हर कोई है,
घुमके फिरके वो सब के
पास से गुजरता है ।
-