Don't value the other person so much that one day he will make your value zero .......
-
शब्द अंतरीची हाक
शब्द भावनेचा ताल
शब्द आठवणींचा झोका
शब्द आयुष्याचा ठेवा
आमचं होत बालपण मित्रांसोबत
वेगवेगळ्या खेळासोबत,
कधी लपंडावं तर कधी लपाछपी
तर कधी पकडापकडी,
दिवस कसा निघून जायचा हे समजतच नव्हतं.....
शरीर थकायचं,
पण रात्री सुखाची झोप लागायची.....
आता दिवस कुठून उगवतो आणि कुठून मावळतो
हे समजतच नाही,
फक्त Online game खरी मज्जा तर मुलांना माहीतच नाही,
मित्रांसोबतच्या गप्पा, खेळ, एकमेकांसोबत खालेल्ले डब्बे सर्व काही आता मागे पडलं,
कारण बालपणीच्या सगळ्या गोष्टींची जागा mobile ने घेतली आहे.....आता उरलं आहे ते फक्त
Online friends, online games बस्स.......
-
किसी ने लिखी हुयी कहानी का
आखरी पन्ना हमारा हो ये जरूरी तो नही......-
*रणरागिणी*
तिनं स्वप्न पाहिलं उंच उडण्याचं, गगनभरारी घेण्याचं, "चुलं आणि मुलं" याच्यातून बाहेर पडून
स्वतःला सिद्ध करण्याचं...पण...
पण या समाजानं कधी मान्यचं केलं नाही
तीचं पंख पसरवून उंच उडणं...आणि मुक्तपणे जगणं...
म्हणून ती गप्प बसली नाही,थांबली नाही,नुसतीच रडतं बसली नाही,
निराशा पदरी पडली तरी हताश झाली नाही...
ती उभी राहीली पाय रोवून,
लोकांचा विरोध सहन करत,
अन्याय, अत्याचाराशी दोन हात करत,
तिने हारच मानली नाही कधी.
तिच्यात जिद्द होती आकाश कवेत घेण्याची,
नवनेतृत्वाची...
स्वतःच्या पावलांवर उभं राहण्याची,
स्वतःला मजबूत अन् कणखर बनवण्याची...
तिचा तिच्या क्षमतेवर होता विश्वास,
स्वतः चं अस्तित्व तिला सिद्ध करायचं होतं,
बंधन झुगारून उभं रहायचं होतं...
खांद्याला खांदा देवून येणाऱ्या पिढ्यांचं नेतृत्व करायचं होतं...
हेच ध्येय उराशी बाळगून, ती चालतं राहीली एक एक पाऊल...जिद्दीनं... आणि याचं अतूट जिद्दीमुळे तीला होता आलं शिक्षक, वकील,राष्ट्रपती, पंतप्रधान,डॉक्टर,पायलट अजून बरंच काही...
याचं जिद्दीने तिने विश्वास ठेवला स्वतःच्या कर्तृत्वावर...
संकटांना न घाबरता, न जुमानता,तिने ओलांडला घराचा उंबरठा आणि केली पार समाजाची चौकट...
जिजाऊंचा, सावित्रीबाईंचा, रमाईंचा, अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतं
ती बनली स्वतःसाठीचं रणरागिणी...-
काळ्याभोर केसात घातलेला
तो मोगऱ्याचा गजरा,
तीच सौंदर्य वाढवतोच सोबत
त्या नात्याचही सौंदर्य वाढवतो...-
कहानिया तो हम रोज पढते हैं लेकिन
आज भी हमें तुम्हारी लिखी कहानी पढना पसंद हैं......-
"When you are happy for no reason, believe that someone somewhere is praying for you.....!!
❤️🤗🤍
-