Pooja Kelkar   (पूजा..)
445 Followers · 450 Following

भारतीय 🇮🇳
मानसशास्त्र विद्यार्थिनी 😈
Insta ID: shabdamayi_
Joined 14 July 2020


भारतीय 🇮🇳
मानसशास्त्र विद्यार्थिनी 😈
Insta ID: shabdamayi_
Joined 14 July 2020
30 MAY 2023 AT 8:43

'आसू' आणि 'हसू' यांचा ताळमेळ घालता आला की सोप्पं होतं आयुष्य!

-


28 MAY 2023 AT 23:57

आपलं हसू जपणाऱ्या माणसांना जपायचं असतं!

-


26 MAY 2023 AT 17:18

जुन्या जखमा भरायला लागल्या की नवीन घावांसाठी सज्ज होता येतं!

-


22 MAY 2023 AT 0:02

आज इथे, उद्या तिथे
तू असशील, तू नसशील..
तुझ्या असण्या नसण्याने,
बहर काही सरत नाही..
कोण म्हणतं तुझ्याशिवाय,
चाफा दरवळत नाही?!

-


17 MAY 2023 AT 16:30

त्याला आठवत होतं तिचं बोलणं..
सहा वर्षांपूर्वी ती म्हणाली होती त्याला..
" खूप खूप घाव आहेत रे या इथे..
इतक्या सहज कश्या विसरू आधीच्या वेदना?
पुन्हा एकदा प्रेमात पडायची पण भीती वाटते आहे मला..
असं नाही की तुझ्याच प्रेमात.. कोणाच्याच प्रेमात...
तुटून गेले आहे रे मी... खूप कष्टाने उभं केलंय स्वतःला..
आता पुन्हा अडकून, पुन्हा तेच घाव सहन करायची हिंमत आणि ताकद नाहीये माझ्यात..."
तेव्हा फक्त त्याने एवढंच सांगितलं होतं..
" निर्णय तुझा.. मी कधीच फोर्स नाही करणार तुला..
मी प्रेम करत होतो, करत राहीन..
तुझ्या सगळ्या जखमा बऱ्या होईपर्यंत थांबायला आहे ग मी तयार...
पण ह्याची शाश्वती नक्की देतो, मी सोबत असताना तुझ्यावरचे सगळे वार आधी मी सोसेन, तुझ्यावर कोणताच घाव होऊ देणार नाही..."
.....आज लेबर रूम मधून तिचा येणार आवाज ऐकून त्याला हेच पुन्हा पुन्हा आठवत होतं,..
आणि तो विचार करत होता,.
'ह्या वेदना पण वाटून घेता आल्या असत्या तर....!!'

-


13 MAY 2023 AT 17:51

जपून बिपून ठेवलेल्या
आठवणी पण तळ गाठतात,
प्रेम बिम सब झूठ,
जखमा तेवढ्या खऱ्या वाटतात!

-


8 MAY 2023 AT 6:59

उन्होंने कैद करके रखी थी
एक चिड़िया, पिंजरे में..
उसके लिए दाना पानी का इंतजाम भी अच्छेसे किया था..
पर जब से पिंजरे में बंद हुई,
चिड़िया ने कभी न कुछ खाया, न पिया..
और फिर तड़पकर मर गई...
असल में वो कभी समझ ही न पाए,
के उसे भूख थी तो
सिर्फ़ और सिर्फ़ आज़ादी की!

-


7 MAY 2023 AT 11:25

साध्या सुगंधालाही पारखी झाले आहे मी,
बघ तुला कधी "बकुळ" होता आलं तर..!

-


7 MAY 2023 AT 0:33

जुने घाव विसरण्यासाठी
नवीन डाव मांडायचा नसतो!

-


7 MAY 2023 AT 0:33

जुने घाव विसरण्यासाठी
नवीन डाव मांडायचा नसतो!

-


Fetching Pooja Kelkar Quotes