Pooja Dheringe  
179 Followers · 52 Following

https://cozyywords.blogspot.in/2017/11/blog-post.html?m=1
Joined 4 November 2017


https://cozyywords.blogspot.in/2017/11/blog-post.html?m=1
Joined 4 November 2017
30 AUG 2023 AT 21:20

एखाद्या व्यक्तीबद्दल मनात इतकाही द्वेष उमटू नये की
तिने पूर्वी आपल्यासोबत जगलेल्या सुंदर आयुष्यावर
प्रश्नचिन्ह उमटून शंका निर्माण व्हावी!

आठवणींचा आदर करता यायला हवा!
- पूजा ढेरिंगे

-


17 AUG 2023 AT 18:47

काही गोष्टी सोडून दिल्यावर नीट होतात.

Some things get better
when you start letting them go.

-


23 APR 2023 AT 9:13

ही फोटोतली रिकामी जागा
नव्या कोऱ्या वर्षानुवर्ष धूळ खात
पडणाऱ्या पुस्तकांना द्यायची,
स्वतःच्या ज्ञानाने भरायची,
दिखाव्यासाठी पुस्तकांना द्यायची
की मग ज्ञानार्जन करून स्वतःत
पेरून घ्यायची, आपण ठरवायचं!
पुस्तकांचा सुर घ्यावा,
ध्यास घ्यावा अस्सलतेचा,
हे वर्तुळ वाढवावं, वाटावं, भाग्यवान व्हावं
नि दान द्यावं नव्या पिढीला,
पृथ्वीवरच्या खऱ्या सुखाचं!
- पूजा ढेरिंगे

-


31 DEC 2022 AT 14:55

....

-


23 DEC 2022 AT 20:59

सगळ्यात अन्कफर्टेबल ठिकाणी आपल्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट घडत असते.
त्यामुळे आपल्या रोजच्या कंफर्ट मधून बाहेर पडून सूर्य, तारे, निसर्ग, माणसं आणि जग पहा!
या जगात अमर्याद दृष्टिकोन आहेत,
जे या एकाच आयुष्याला करोडो अर्थ देणार आहेत !
- पूजा ढेरिंगे

-


14 DEC 2022 AT 19:53

माणूस माणसाच्या प्रेमाचा भुकेला असतो.
- पूजा ढेरिंगे

-


9 DEC 2022 AT 20:02

आपल्या बाबतीत एखादी गोष्ट सहज झाली
तर ती एवढ्या दिवसाची "मेहनत"!
पण तीच दुसऱ्याच्या बाबतीत घडली
तर ते "नशीब"
- पूजा ढेरिंगे

-


3 DEC 2022 AT 19:18

आयुष्य जगणं ही सुद्धा कलाच आहे.
जसं कला शिकवून जमण्याची गोष्ट नाही,
तसंच आयुष्यही सांगून
अनेकांना जगता येत नाही.
- पूजा ढेरिंगे

-


30 NOV 2022 AT 19:37

आपली स्वप्न कुणाच्यातरी हातून धूळ साफ करताना दिसू नाही म्हणजे झालं!
- पूजा ढेरिंगे

-


26 OCT 2022 AT 17:53

गेल्या काही दिवसात
एवढंच काय ते आयुष्य कळलं,
"मन लागतं, तिथे स्वर्ग लाभतो!"
- पूजा ढेरिंगे

-


Fetching Pooja Dheringe Quotes