काहीतरी असेल रे आपल्यात, न जाणो वाटत तुझ्याकडे बघतांना |
हि शांत रात्र, मंद हवा आणि चाफ्याचा तो दरवळलेला सुवास, काही शब्द आपसूकच सुचतात तुझ्यात रमतांना ||
निर्णयाच्या धावपळीत थकलेला मी जेव्हा बघतो तुझ्याकडे, असतोस नेहमी तू हसतांना |
काहींना कवि तर काहींना लेखक असतो मी
त्यांना हसून विचारतो,
होतात कुठे तुम्ही आमच्या गोष्टी रंगतांना ||
दिवसा सूर्य तर रात्री तू, देतो एक नवी उमेद सगळ्यांना |
चांदोबा! चांदोबा! म्हणून ख्याती तुझी, दिसतोस नेहमी तू लपंडाव खेळताना ||
अनंत मौनेत जरी असलास तरी भासतोस तू बोलका |
प्रयत्न असतोच नेहमी माझा, पोहोचेल तुझपाशी बनवूनी शब्दांची नौका ||
या जीवनाचा मी प्रवासी पक्षी, होतो घायाळ या सफेद नक्षी |
काय चूक त्या निशाचराची, त्यालाही वाटत अनुभवावी जादु रात्रीची ||
पावसाच्या त्या ओसरत्या सरी सोबत, मंत्रमुग्ध केलेल्या त्या काजव्याला ही विचारतो |
ही रात्र कुणाची!!
ही रात्र कुणाची!!-
रातों के जुगनुओं का खेल चल रहा था |
उसमें चाँद अपनी रोशनी खिलखिला रहा था ||
आज उसकी रोशनी मै वो बात नहीं लगी |
तो पूछा उसे ||
ऐ चाँद!! आज इतना खामोश क्यूँ हैं |
ज़वाब मै वो बोला |
क्या बताऊँ मेरे दोस्त ||
पहेले हर शक्स मुझे देखके उसके प्यार को याद करता था|
आज वहीं शक्स मुझे देखके उसके प्यार की फ़रियाद करता है!!-
चार भिंतीतील भयाण शांततेत आता मनातील अबोल भावना अशांतता पसरवू लागली, काही प्रश्न पाण्यावर पोहणारे आता पाण्यात खोलवर बुडू लागली!!
जीवनाच असच असत, उत्तर ज्यांचे होते ठाऊक तेही
आता उलट प्रश्ने विचारू लागली. किती वेळ, नाही किती वेळ! असाच इथे फक्त उभा राहशील, आरशातील प्रतिमाही आता मला विचारू लागली!!
बस्स ठरवल आणि ती नीरव शांतता माझी आता मनातील बोल बोलू लागली, विश्वासाची ती दोर अजून मजबूत गुंफू लागली!!
प्रतिमा आणि मी पहिल्यांदाच मनातील अथांग सागराच्या लाटांसमवेत कुठेतरी दूर गेलो, एकमेकांना त्यांची प्रतिभा नकळत स्वतःलाच समजावू लागलो!!
ठेवून हाथ एकमेकांच्या खांद्यावर विश्वासाचा,
नकळत स्वतःलाच सावरू लागलो, ऐक तू जरा माझ अस म्हणून स्वतःलाच उद्देशुन म्हणू लागलो!! की
पडलास तरी चालेल, जखमी झालास तरी चालेल पण कधी कुणा दुसर्याचा हाथ घेऊ नकोस, स्वतः उठ, जखमा भरतील शरीरातील आणि मनातीलही फक्त तू धीर काही केल्या सोडू नकोस!!
अस म्हणून माझी प्रतिमा क्षणात अदृश्य झाली, नकळत का होईना मला माझ्या प्रतिभेची जाणीव करून दिली!!
मनात चालणारी ती नीरव अशांतता आता शांत झाली होती आणि कधी पुन्हा पडलास तर मी पुन्हा साथ देईल अस म्हणून ती प्रतिमा माझ्याकडे हसत पाहत होती!!
तेव्हा मला जाणवल की आता त्या आरश्यात ती प्रतिमा नसून फक्त मी होतो!!
प्रत्येक वेळी आरश्यात मी स्वतःलाच उभा पाहत होतो!!-
कधी गरज ना शब्दाची मला
नेहमी माझ्या हावभावेने ओळखणारी तु!!
कितीही थकलेली असली तरी
लाडाने माझे हट्ट पुरवणारी तु!!
वेदनेत आलेल पहिल स्मरण
तर आपसूकच निघालेली हाक तु!!
घरातून दूर जाताना आलेल पहिलं अश्रु तर
घरी आल्यावर येणार गालावर पहिलं हसु तु!!
असा शब्द ना सापडला मला
ज्यात संबोधली जाशील तु!!
मी आहेच कोण ग जो लिहिल तुझ्यावर
मलाच लिहिणारी अशी तु !!
कठीण वेदना नऊ महिन्याच्याच काय
प्रत्येक जन्माला लाडाने मला पोटात मिरवणारी
अशी आई आहेस तु!!
अशी आई आहेस तु!!-
तुला चोरून बघतांना
हृदयाचे ठोके वाढतात
तुला चोरून बघतांना
मनाच्या फुलबागेत फुलपाखरे येतात
तुला चोरून बघतांना
मान जरी सरळ असेल तरी
डोळे असतात फक्त तुझ्याच शोधात
तुला चोरून बघतांना
सापडतो माझ्या मित्राला
मग वहिनी वहिनी म्हणून तुला चिडवतात
तुला चोरून बघताना
झाला असा चमत्कार
तुझे डोळे ही होते माझ्या शोधात
मग काय झाली चकमक दोघांच्याही हृदयात
आणि सुरुवात झाली स्मित हसण्यात
तुला चोरून बघतांना...
-
उगाचच बनवून मोठ त्याला
त्या खाली दबतो तू
सरळ असलेल्या रस्त्यावरील वळणाला
उगाचच घाबरून थांबतो तू
यशाच डोंगर चढतांना आलेल्या मोठ्या दगडाला पाहून
उगाचच पुढच पाउल मागे घेतो तू
स्वप्नाला प्रत्यक्ष रूपात आणणाऱ्या त्या पुलाला
उगाचच "अडचणी" हे नाव देतो तू
ही वळणे, ही दगडं, आणि स्वप्नाला जोडलेल्या पुलाला मित्रा नको ना घाबरू ईतका तू
फक्त येणार्या प्रत्येक कठीण अडचणीला
उगाचच तेवढ्याच कणखरतेने हसायला मात्र विसरू नको तू....
-
अरे.. स्वर्ग ही फिका पडेल या राष्ट्रा समोर
ज्याच्या नावातच राष्ट्र आहे ...
ज्याच्या रणांगणावर धावतात मर्द मावळे जे इथले शस्त्र आहे...
कुठल्याही वादळाला लाजवेल असा आमचा सह्याद्री उभा इथे निर्धास्त आहे..
घटना लिहिली गेली इथे स्त्री-शिक्षण ही इथेच घडले आहे..
अतिरेकी असतील तर येऊ देत इथे त्यांना चिरडून टाकायला शिवरायांचे गड किल्ले शानाने उभे आहे...
देखणे वस्त्र नेसायला बळीराजा इथे रोज कष्टाची पायरी चढतो आह़े...
प्रत्येकाला आपलस करणारी आणि स्वप्नांच घर असलेली मुंबई इथे नांदत आहे...
गंगा- कृष्णा चाखायला सर्व जग वाट बघत आहे...
वाघांची जननी आहे ही माती ह्या राष्ट्राला जिंकले रक्ताच्या धारेणे आहे..
असा हा "महाराष्ट्र माझा "ज्याने सगळ्या जगाला जिंकले आहे..
- पियुष गायकवाड-
स्वप्न तर नाही ना बघतोय!!
कुजबुज चाललेली प्राणी.. पक्षी आणि झाडात..
प्राणी -
नेहमी आपण असतो पिंजर्यात
आज माणूस आहे त्यात..
रोड जो होता यांत्रिक म्हशींच्या गर्दीत
त्यावर आपण फिरतोय मस्तीत...
आता आपणही फिरु तेही ना कुणाच्या धास्तीत
पण झालंय तरी काय या मानवांच्या वस्तीत??
पक्षी-
झुंजत होतो कार्बन डाय ऑक्साईड च्या तळ्यात
लाही लाही व्हायची अंगाची यु. वी. बाणाच्या घातात
देवाची कृपा की निसर्गाची माया!! काय माहीत
अचानक आला ऑक्सिजन चा सुवास
आणि आला श्वासात श्वास..
निधळ्या छातीने वाचवण्याऱ्या ओझोनाने दिली साथ
आणि आता उडतोय खूपच उंच तेही एकसाथ..
झाड -
कोरोना!! कोरोना!! आहे याला कारणीभूत
आपल्यासाठी योगायोगाने तो मित्र,
तर मनुष्यासाठी तो यमदूत..
मलाही वाटल वाईट ऐकल्यावर ही बाब
पण मनुष्यच असतो त्याच्या "कर्मा" चा बाप..
होईल ही परिस्तिथी नीट आणि छान
पण गरजेचेच होत माणसाला बसणे हा बाण..
केली त्याने कत्तल ... घेतले त्याने प्राण
म्हणूनच निसर्ग भरतोय मनुष्याचे हे कान..
-
गरजेचे नसतात व्यक्त व्हायला शब्द...
काही न बोलता ही करता येत स्तब्ध..!
शब्द न उफाळता ही व्यक्त होते भावना...
कलाकारांना नको आहे हा शब्दांचा खजिना..!
सांगून जातात भावनेतून दुनियादारी आणि खूप काही..
माणूस काय हो तो तर जाईलच
पण
कलाकार हा कधीच मरत नाही...
-