Pallavi M. Dhobale  
285 Followers · 686 Following

Joined 14 August 2019


Joined 14 August 2019
9 NOV 2020 AT 21:53

जगण्यात ह्या असावे  ...ऋणदार ना कुणाचा
टिकला कधी भ्रमाने..... संसार ना कुणाचा
प्रश्नांत रोज असतो....सुटलो अजून कोठे
झालाय आजवर हा...अंधार ना कुणाचा
आहेत तेच त्यांची .....ती माणसे जिवाची
मज सोडले जगाने....मी यार ना कुणाचा
दिसतात ओळखीचे.... मंचावरी कितीदा
गरिबांस बघ मिळाला...सत्कार ना कुणाचा
विद्रोह मांडले शत.......शब्दांत भावनांचा
धाकात सोसलेला.......मी वार ना कुणाचा

.....पल्लवी....

-


28 OCT 2020 AT 10:08

प्रगती, अधोगती आणि
अस्तित्वाच्या वादात नेहमी
आयुष्याची राखरांगोळी,
मनाची हेळसांड आणि
विश्वासाची किंमत वेळेनुसार
माणसाकडून हिणवली जात असते

-


26 SEP 2020 AT 18:41

आसवांच्या पल्याडचं आयुष्य
दाखवावंस वाटत नेहमी मला
पण आसवे हि संपत नाहीत
ना आसवांचा निःपक्ष धर्म
समुद्र नाही या आसवांना
ना कुठला स्थिर किनारा
हा नेहमी आपल्याच प्रवाहात
वाहत असतो स्वतःहून एकटाच
साथ तर हवी असते याला पण
ह्या दुःखाच्या लहरी आसवांना
तळाशी अथांग भिजवून ठेवतात

-


26 SEP 2020 AT 18:31

बहोत सी शिकायते हैं तुम्हें मुझसे
या तो शिकायत कर या मुहब्बत

-


16 SEP 2020 AT 20:20

कितनी खामोश सी हरकत हैं इन नजरों कि
छुपती हैं और छुपाती हैं इश्क को इश्क से

-


31 JUL 2020 AT 22:43

तू नेहमी मला चौकटीच्या आत
आयुष्य रगडताना पाहिलंस
पण चौकटीतल्या दरवाज्यात
उभी राहून ह्या बाह्यरूपी जगाला
पाहून मधल्या मधल्या जळताना
कधी तू पाहिलं नसशील मला
किती स्वप्न तोडून जगतेय मी
हो अर्थातच तसंच करतेय मी
ह्या स्वप्नांनी खुपदा हिणवलं आहे
मला प्रत्येक पावलापावलांवर
ज्याची खूप मोठी किंमत मला
नात्यांना ह्या बंद मुठीत करताना
वेळोवेळी मिळत गेलेली आहे

-


31 JUL 2020 AT 22:28

जनाजा तो उठा लिया है मेरे अरमानों का
और कहते हैं वो कभी हँस भी लिया करो

-


28 JUL 2020 AT 22:37

फुरसत नहीं हैं उन्हें किसी से मिलने तक कि
गुमशुदा हुए हैं या फिर गुमनाम होना चाहते है

-


28 JUL 2020 AT 22:33

जरूरत के ठिकाने बदलने लगे हो तुम
शायद किसी और से मिलने लगे हो तुम

-


28 JUL 2020 AT 22:29

मुहाल हैं साहिब यह तेरा खयाल भी
करीब न होकर भी नजरों में जीता हैं

-


Fetching Pallavi M. Dhobale Quotes