आठवणीतला पाऊस तो
आजही मनाला छळतो
हिरवे राण फुलण्यास
डोळ्यातील आसवेच कामी पाडतो-
नकोत मला तुझ्याकडून
चंद्र , सुर्य , तारे....
तुझ्या काळजात सख्या
जागा मला दे ना रे....
-
आज खूप दिवसांनी
पुन्हा एकदा सांज दरवळून गेली ...
रात्रीच्या कुट्टं सावल्यांवर ही
जणू प्रेमाची शिंपण झाली ...
पाहुनी रंग गुलाबी निशीचा
माझी धडधड वाढवून गेली...
तुझ्या निशब्द त्या भावनांची
माझ्या मनालाही जाणीव झाली...-
फुलापरी स्वप्ने केली गोळा
आता सांग रे तुझ्या विना...
शिंपुनी जा रोमांचित जल ते पुन्हा...
ओढ लागली ह्या मना...
सहन नाही होत रे मजला
विरहाच्या ह्या वेदना....
ये रे ये तू ये सजणा......!!-
फुलापरी स्वप्ने मी केली गोळा
आता सांग तुझ्या विना...
शिंपुनी जा रोमांचित जल ते पुन्हा...-
पुन्हा पुन्हा त्या आठ्वणित ..
त्याला बघतांना पाहून गालत हसावसं वाटत ..
आजही त्या क्षणांना आठवून मन हरवुन जात
पहिलं प्रेम म्हटलं की आठवतं...
सकाळची वेळ ती
गार थंड हवा ती
तुला बघण्यासाठी
माझी गाडी ही हळूच चालायची
तुला बघतांना पाहून मला असं वाटायचं
तुलाही कधि माझ्या डोळ्यात तुझ विश्व दिसायचं
तुलाही तेव्हा बराच वेळ असायचा
मला बघण्यासाठी रोज वळणावर त्या भेटायचा....
लोक म्हणतात की विसरून पुढे जायचं असतं.
आपल्या मार्गावर चालायचं असतं.
कोणीतरी सांगाल का त्यांना की इतक्या सहज विसरणारं असतं
तर ते पहिलं प्रेम थोडीच असतं...💖
-
आयुष्याचे क्षण म्हणजे
रित्या मनाची करून ओंजळ
जमतील तितके वेचायचे..-
रातराणीच्या सुगंधात तुझाचं गंध
मनात माझ्या तुझाच छंद
हरवल्या सारखे पाहणे तुला
माझ्या प्रेमाच गणित न कळलं मला-