पाटलांचा विठ्ठल..!   (VITTHAL PATIL)
104 Followers · 221 Following

Joined 13 October 2019


Joined 13 October 2019

नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव । मी भक्त तू देव ऐसे करी।।१।। दावी रूप मज गोपिका रमणा । ठेऊ दे चरणा वारी माथा ।।२।। पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ।।३।। पुसता सांगेन हित गुज मत । बैसोनी एकांत सुख गोष्टी ।।४।। तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ।।५।।

-



इंद्रायणी काठी देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची!!धृ!!
ज्ञानीयांचा राजा भोगतो राणीव
नाचती वैष्णव मागेपुढे!!१!!
मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड कैवल्याचे!!२!!
उजेडी राहीले, उजेड होऊन
निवृती सोपान मुक्ता बाई!!३!!

-



आळंदी हे गांव पुण्यभूमी ठाव
दैवतांचे नाव सिद्धेश्वर!!धृ!!
चौ-यांशी सिद्धांचा सिद्धभेटी मेळा
तो सुख सोहळा काय वानू!!१!!
विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव
स्वर्गाहुनी देव करितसे!!२!!
नामा म्हणे देवा चला तया ठाया
विश्रांती घ्यावया कल्पवरी!!३!!


-



रुपी गुंतले लोचन
चरणी स्थिरावले मन!! धृ!!
देखभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला!!१!!
कळो नये सुख दुःख, तहान हरपली भुक!!२!!
तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागती!!३!!

-



वेढा रे, वेढा रे, वेढा रे, वेढा रे पंढरी
मोक्ष लावा भीमातीरी!!धृ!!
चला चला संतजन, करू देवाशी भांडण
मोक्ष लावा भीमातीरी!!१!!
लुटा, लुटा पंढरपुर धरा रखुमाईचा वर
मोक्ष लावा भिमातीर!!२!!
तुका म्हणे चला चला,धाव विठूशी घातला
मोक्ष लावा भिमातीर!!३!!

-



ठायी ठायी विठ्ठल
ठायी ठायी पंढरी
आम्ही विठ्ठलाचे वारकरी!! धृ!!
आता अंतरंग झालो पांडुरंग
तुळशी माळ गळा झालो निसंग
डोळा चंद्रभागा, तिर्थ अंतरी!!१!!
आम्ही ज्ञानदेव आम्ही नामदेव
आम्ही एकनाथ आम्ही पुंडलिक
आम्ही होतो तुकया छंद तो गजरी!!२!!
फिरविले जाते ज्याने जनाईचे
तोच फिरवितो जाते ब्रम्हांडाचे
त्याच्याविण कोण अंतरी बाहेरी!!३!!

-



पक्षी अंगणी उतरती
सारे गुफूनिया रे हाती!! धृ!!
वस्ती करे वस्ती आला
प्रा:तकाळी ऊठूनी गेला!! १!!
शरण एका जनार्दना
ऐसे असता भयकवणा!! २!!

-



जागा रे गोपाळानो,
राम नाम जागा!! धृ!!
कळीकाळ आकळा, महादोश जाती भंगा!!१!!
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन
एकादशी नेमा तूम्ही जागा जागरण!!२!!
द्वादशी खिरापती कोटीकुळे उद्धृत
नामा म्हणे धाव केशवा येईल वैकुंठी!!३!!

-



माझा देव पंढरी पंढरी, चंद्रभागेच्या तिरी देव विठेवरी!! धृ!!
आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाती
आनंदे नाचती जिवे भावे!! १!!
राजा द्वारकेचा पंढरीशी आला
आनंद झाला सनकादिका आनंद झाला!! २!!
म्हणे कान्होपात्रा दिनांच्या दयाळा
विठ्ठला केशवा भेट देई विठ्ठला केशवा!! ३!!
माझा देव पंढरी पंढरी
चंद्रभागेच्या तिरी देव विठेवरी

-



दिनाची माऊली आजीम्या देखियेली!! धृ!!
कटी ठेऊनिया कर, उभी राहे विठेवर!! १!!
मुकुट रत्नांचा साजिरा, करी मोतियांचा तूरा!! २!!
रुप लावण्य गोजिरे, ह्रदयी पदक साजिरे!! ३!!
कासे पिवळा पितांबर,चरणी ब्रिदला तोडर!! ४!!
भक्त कृपेची साऊली, नामावंदी पाय धुळी

-


Fetching पाटलांचा विठ्ठल..! Quotes