सुखाच्या शोधाचा अंत नसतो म्हणून
माणूस कधीही शांत नसतो...
@नितीन शिंत्रे-
बस अपने अनुभव को शब्दों से सजाता हूं...!
रिमझिम बरसत होती
पावसाची बेधुंद सर
नव्याने करून देत होती
तुझी आठवण दिवसभर...-
आठवणींच्या जगात
फिरून बघ एकदा ...
मी भेटेन तुला नक्की
कुठल्यातरी वाटेवर ...-
कोणावरही एकतर्फी प्रेम करणे हा "वेडेपणा"
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही "भेट"
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने
आपल्यावर प्रेम करणे म्हणजे "आयुष्य"...!!-
आठवणीतले प्रेम आणि
प्रेमातल्या आठवणी ...
कधीच विसरता येत नाही-
लोकांना स्वतः सुखात असतांना
दुसऱ्यांच दुःख दिसत नाही...
आणि स्वतः दुःखात असतांना
दुसऱ्यांच सुख पाहवत नाही...
- नितीन शिंत्रे-
वाटलं नव्हतं भेटशील पुन्हा
वाटलं नव्हतं आठवेन मी तुला
वाटलं नव्हतं प्रेम आजही असेल
वाटलं नव्हतं तुला पुन्हा मी दिसेन
वाटलं नव्हतं तू स्वीकारशील पुन्हा
वाटलं नव्हतं माफ करशील गुन्हा
वाटलं नव्हतं पुन्हा परत अस होईल
वाटलं नव्हतं तुला कवेत मी घेईन
सार माझं वाटणं तू फोल ठरवलस
आयुष्यभरासाठी प्रेमात कैद केलंस...-
हक्कच नाहीय तुझ्या शरीरावर माझा
तरीही मनानं मी शेवटपर्यंत फक्त तुझा ...-
ओढ तुझी संपतच नाही
तू कायमचीच का येत नाही ...
तोड जगाच्या बेड्या साऱ्या
मला तुझ्याविना राहवतच नाही....-
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा,
पाव्यातला सूर जैसा ओठांतूनी ओघळावा,
झिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधूगंध द्यावा,
हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा !-