आजचा दिवस उद्याचा भुतकाळ होतो माहीत आहे सर्वांना अन् माणूस हा असा प्राणी आहे की तो कायम भुतकाळ चघळत बसतो मग तो गोड असो वा कडु ,त्यासाठीच उद्या च्या गोड आठवणी अन् आनंद आजच साजरा करा प्रत्येक येणारा दिवस जगू की नाही माहित नाही पण आजचा दिवस आपल्या हातात आहे म्हणून आजच भरभरून जगा तुमचा उद्या सहज सुखी होईल ,यातला थोडा जरी आनंद दुसऱ्यांना आपल्याकडून देवून पाहा तुमच्या सारखा सुखी आत्मा दुसरा कोणीच नाही मग !
-
तुझ नी माझ नात असं असावं
ज्याला ना नावं असाव
ना नावाची गरज भासावी....
ना प्रत्यक्ष भेटीची गरज असावी ...
त्या नात्याच्या #नशिबी कायम झुरने असावं
फक्त तू ऑनलाईन दिसण्यानं
काळजाची स्पंदन आपसूकच वाढाव ..!
जे नातं वहीच्या शेवटच्या पानी असावं. .
ज्याला उलगडताना माझी बोटं
आपोआप सगळी पानं चाळून
शेवटीं त्या पानी येऊन थांबावी...!
@nil-
वेळेने वेळेला एक वचन दिले
की जाशील तिकडे वेळ पाळ
अन् वेळेला नक्की वेळ देत जा !!
वेळेने देखील तसेच केले
पण ज्यांनी ज्यांनी वेळ पाळली नाही
त्यांना मात्र वेळेने वेळेवर दगा दिला !!-
जगी सुखाचे भाव विरले,
झाले संप्लवन प्रेमाचे कितीदा...
उडून गेली नाती सारी अन्..
उरलो पुन्हा मी एकटा!!!
कुणास हाक देऊ आता,
चालताना मज टोचे काटा,
एकाकीचे रडणे सारे देवा,
सले जिव्हारी त्या गर्द वाटा!!!
विरून गेले नभ सुखाचे,
भरून आले कोरडे मन हे,
रडू कसा मी कुणास सांगू,
मज नाही उरले सख्खे नाते!!!-
#तेरी_आदत
एहसान नहीं एहसास चाहिए !
आम नहीं कोई खास चाहिए ,
ऑप्शन तो हर कोई रखता हैं जिंदगी में,
हमे तो दिल में पर्मनंट जगह चाहिए !!-
कधीच दुरुस्त न होणाऱ्या
गोष्टींची वैचारिक वारंवारता
जेव्हा वाढते तेव्हा खरी
हळव्या मनाची कसोटी लागते!!-
नाते खरे असेल तर
दिखाव्याचा मुलामा न लावता
नजरेतील प्रेम नक्की समजते पुढच्या व्यक्तीला
मग तिथे शब्द ही फिके पडतात!!-
निडर होके करते है हम इश्क जनाब
देख लेना साथ निभाना तो आपको है,
शायद तुम्हारे मायके को खुद का ससुराल
बनाने आयेगी ये लडकी!-
राहील...
तुझ्या माझ्यात जे समांतर राहील,
हक्काचं घर अन् प्रेमाचं गुणोत्तर राहील,
असेल मी तरीही दृष्टिक्षेपात तुझ्या ,
जिथे तु मला तुझ्या नंतर पाहिलं!!
-
साठलेले असतात डोक्यात ,
अडकलेल्या असतात भावना ,
इवले इवले विचार पंख घेऊन उडतात ,
अन् हजार जखमा खाऊन पुन्हा
त्याच डोक्यात येवून तडफडतात,
शेवटी अपूर्ण राहिलेले पूर्ण करता करता
जीवनाची भाषा स्तब्ध होते अन्
विचारांचे लपंडाव संपून कायमची exit होते!-