हात हातात एकमेकांच्या
जीवनभर विश्वासाने रहावा,
सहवासाच्या वेल्हाळ धुंदीत
रंगीत जीवनाचा कणकण व्हावा...
अडीअडचणी, खाचखळगे कैक
विश्वास, प्रेम गुंफलेली विण एक,
दरवळला प्रीतीचा गंध जीवनी ह्या
ओळावले मोहरले क्षण क्षण अनेक..
आयुष्याची सर्व स्वप्ने मोहरवी संगतीने
उंच उंच झोके झुलावे सुखाचे उमळण्याने
रेशीम गाठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चांदणे पांघरलेले शिंपावे ह्या दिवसाने..🥰🥰
- Nishu
7 FEB 2023 AT 12:54