दुखः असल्यावर मरण पण सोपं वाटतं
अणि सुखात असलं की ठेच नकोशी वाटते.-
माझे दिवस असे असले तरी असणार नाही
येणार आहे दिवस आपला तो घरी बसणार नाही!!-
संध्याकाळी ऑफिस मधुन घरी
जाताना तु आणि मी कॉफी पित
असताना तुझा सहवासातली एक गोष्ट.
"तुझं हसणं.
तुझं सुंदर दिसणं.
तुझं माझ्याशी बोलणं.
तु आणि मी सोबत चालणं .
कॉफी पिऊन झाल्यावर
तुझा सोबत जाण्याचा मार्ग माहीत
नसताना तु नेशील तिकडे माझं येणं.
तुझं माझ्या सोबत रडणं.
तुझा प्रत्येक प्रश्नाला माझं उत्तर देणं.
तुझं माझ्याकडे सारखं पाहणं.
तुझा हात माझ्या हातात हात घेऊन बसणं.
माझा मनातलं सगळं काही तुला सांगण.
तु ही तुझ्या मनातलं मला सांगण.
असो
कॉफी सोबत बसणं खुप छान असतं.
तु जातांना मी भेटेन तुला पुढल्या
रविवारी मी तुला तसा फोन करेन रोज
असं खुप काहीसं सांगुन जाणं
आग लावत गं हे काळजाला माझा...-
मित्रा आपलं आयुष्यच तात्पुरता वेळा साठी आहे.
तर कोणी आपल्या आयुष्यात कायमचं कसं असु शकतं..!!-
मित्रांनो काही गोष्टी गरज नसतांना घेत चला
ह्या लोकांना पण त्यांच जीवन जगायचं असतं!!-