राग आणि द्वेष याच्यात खूप कमी फरक आहे ...
राग हा क्षणिक असतो तर द्वेष कायमचा....
राग आवडीच्या तर द्वेष नावडत्या व्यक्तीचा होतो
रागाने फारफार तर आपली चिडचिड वाढू शकते
पण द्वेषामूळे इतरांसह.आपलाही विनाश.होऊ शकतो-
काही लोकांना आपल्याकडून
फक्त सहानुभूतीची अपेक्षा असते....
कुठलाही प्रतिप्रश्न न करता
फक्त त्यांची दुःखद कहाणी ऐकावी
असे त्यांना वाटत राहते.
त्यांच्या समस्येवर आपण
कुठलाही मार्ग सुचवला
तरी ते आपल्याला
हजार कारणं सांगत रहातील,
पण स्वतः मात्र बदलणार नाही
अशा निगेटिव्ह लोकांकडे
दुर्लक्ष करणं हेच
आपल्यासाठी योग्य असते.-
काहीं लोकांच्या काळजात आपल्यासाठी ओलावा असतो.
त्यांच्या बोलण्यात आपल्याविषयी जिव्हाळा असतो
त्यांच्या आपुलकीमुळे हा नात्यातला ऋणानुबंध इतका घट्ट असतो की आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी त्यांच्या मनात आपण कायम असतो.
-
सगळ्यांसाठी सगळं करुनही
जेव्हा आपल्यालाच बेजबाबदार ठरवलं जात
समोरच्याची धडधडीत चूक आहे कळूनही
जेव्हा आपल्यालाच गुन्हेगार समजले जाते
इतरांच्याच्या आवडीनिवडी जपूनही
जेव्हा आपल्यालाच वाळीत टाकले जाते
तेव्हा माणूस कितीही खंबीर असला
तरीही त्याला थोडं का होईना
वाईट हे वाटतेच...
-
जन्म आणि मृत्यू हया दोन्ही गोष्टींवर
फक्त आणि फक्त नियतीचीच सत्ता चालते.
जगाच्या हया रंगमंचावर आपल्याला Entry देतानाच
नियतीने आपली भूमिका निर्धारित केलेली असते,
तीच भूमिका Exit चे घेईपर्यंत आपण नीट पार पाडायची
आणि परमेश्वर नामक सुत्रधाराची दाद मिळवायची
एवढेच आपल्या हातात असते.
-
जे संकटाना धीराने सामोरे जातात
जे सत्तेत असताना क्षमाशीलतेने वागतात
जे उत्तम वादविवाद करुन सभागृह गाजवतात
जे जीवनाच्या रणांगणावर पराक्रम दाखवतात
जे ज्ञान मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात
असेच लोक महापुरुष म्हणून ओळखले जातात.
-
एखाद्याकडून झालेला आपला अपमान किंवा झालेली अप्रतिष्ठा माणसाला त्या व्यक्तीबद्दल असूया निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो.
आणि मग आपल्या मनातील तीच असूया, असुरक्षितता बनून आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा बनतात.-
काही माणसे आपल्या अगदी डोळयासमोर असतात
पण आपल्याला त्यांचे कधी महत्त्वच वाटत नाही.
कधी त्यांचे महत्त्व जाणवलेच तरी त्यांचा स्वभाव नक्की कसा आहे हे आपल्याला कळत नाही .
आणि त्यांचा स्वभाव जरी कळाला तरी त्यांचे आणि आपले अंतरीचे भाव दरवेळेस जुळत नाही.
-
आपले पद, सन्मान, पैसा, लोकांचे प्रेम हया गोष्टी पाहून
एखाद्याला आपला हेवा वाटणं स्वाभाविक आहे.
पण त्याऐवजी त्याच्या मनात जर
असूया,जळजळ,वाईट मनोकामनाच
येत असतील तर मात्र अशा विकृत
मनोवृत्तीच्या व्यक्तीपासून आपण
दूर असलेलेच चांगले...
आपल्यासाठीही आणि त्याच्यासाठीही !!!-